मुक्तपीठ टीम
योगगुरु रामदेव बाबा यांची आयुर्वेद कंपनी पतंजली हा ब्रँड तसा ता घरोघरी पोहचलेला आहे. त्यांची उत्पादनं संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. बाबा रामदेव यांनी पंतजलीबद्दल दिलेली माहिती देशानं अभिमान बाळगावा अशी आहे. पतंजली समुहाची २०२१ आर्थिक वर्षात एकूण उलाढाल ३० हजार कोटी झाली आहे. इतर कोणी काहीही बोलत असले तरी आमचा कोणाशीही संघर्ष नाही, असं बाबा रामदेवांनी नुकतेच स्पष्ट केले. ते म्हणाले की पतंजलीचे सर्व ८ ते १० प्रमुख ब्रँड चांगला व्यवसाय करत आहेत. आमच्या समुहाची उलाढाल तीस हजार कोटींवर आहे.
पतंजलीचे विक्री वाढवण्याचे नियोजन:
- रामदेव बाबा यांनी सांगितले की,कंपनी त्यांची विक्री आणि विपणन संबंधिक प्रयत्न वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे.
- टूथपेस्ट विभागात त्यांनी १० राज्यांमध्ये कोलगेटच्या पुढे किंवा बरोबरीत आहोत.
- त्यांचा प्रयत्न कोलगेटला मागे टाकण्याचा आहे.
- त्यांच्या सर्व प्रयत्नांचा फोकस हा मार्केट शेअर्स वाढवणे आहे.
दंत कांतीची वाढती चमक!
- बाबा रामदेव यांनी सांगितले की, त्यांच्या स्वदेशी मोहिमेअंतर्गत दंत कांती हे पॉवरहाऊस म्हणून उदयास आले आहे.
- दंत कांती हा आज १२०० कोटी रुपयांचा ब्रँड आहे.
- केश कांती हा केसांच्या श्रेणीतील सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड आहे.
- कंपनीने नुकतेच नवीन प्रगत हेअर ऑईल लॉन्च केले आहे.
- त्यांचा प्रीमियम एलोवेरा ब्रँड देखील वाढत आहे.
- हिंदुस्थान युनिलिव्हर, इमामी आणि इतर स्पर्धक पूर्ण प्रयत्न करत आहेत परंतु या श्रेणीमध्ये पतंजलीचे ८० मार्केट शेअर आहे.
FMCG क्षेत्रातही पतंजलीचा वाढता हिस्सा!
- FMCG हे भारतीय अर्थव्यवस्थेचे चौथे मोठे क्षेत्र आहे.
- घरगुती आणि पर्सनल केअर उत्पादनांचा यात ५० टक्के वाटा आहे.
- तर हेअर केअरचा २३ टक्के आणि फूड आणि बेवरेज १९ टक्के आहे.
- पतंजली आयुर्वेदची २०२१ आर्थिक वर्षात एकूण उलाढाल ९,७८४ कोटी रुपये आहे.
- त्यात ८ टक्के वाढ आहे.
- कंपनीचा नफा १४ टक्क्यांनी वाढून ४२५ कोटी रुपये झाला आहे.
- त्याच वेळी समूहाची एकूण उलाढाल ३० हजार कोटी झाली आहे.
- पतंजली समूहाची उपकंपनी रुची सोया ४३०० कोटी रुपयांची फॉलो-ऑन सार्वजनिक ऑफर आणण्याची तयारी करत आहे.