Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीमाभागातील मराठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी क्रांती दिनी पंतप्रधानांना बेळगाव सीमाभागातून हजारो निवेदने

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठी नेत्यांनाही पाठिब्यासाठी विनंती पत्रे

August 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
kranti din

मुक्तपीठ टीम

सीमाप्रश्‍नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा आणि सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी पत्र पाठवून लक्ष्य वेधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहीमेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी सहभागी व्हावे यासाठी युवा समितीतर्फे मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र राज्यातील खासदार आणि आमदारांना पत्र पाठविण्यात आले होते.

 

त्यानंतर अनेकांनी या मोहिमेत सहभागी होत पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेतले जाईल असे उत्तर कळविले आहे. त्यामुळे युवा समितीच्या उपक्रमात महाराष्ट्रातील नेतेमंडळीही सहभागी होत असल्याने सीमावासीयांनी जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवून आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे असे मत व्यक्त होत आहे.

 

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या माय मराठीच्या राज्यात जाण्यासाठी लढणाऱ्या सीमावाशीयांना न्याय मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून लोकशाहीच्या माध्यमातून शांततेने लढा सुरू आहे. तसेच हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना देखील कर्नाटकी सरकारकडून मराठी भाषिकांना विविध प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागातील ४० लाख जनतेच्या मागणीकडे लक्ष द्यावे आणि ज्या प्रमाणे आसाम व मिझोरम येथील सीमावाद संपवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे त्याचप्रमाणे बेळगाव आणि सीमावासियांचा अस्मितेचा प्रश्न असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न कडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह इतर लोकांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पाटील यांच्यासह मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे प्रवीण दरेकर, सीमासमन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री छगन भुजबळ आदिना खानापूर तालुका अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष पिंटू नवलकर आदींनी निवेदन पाठवले आहे.


Tags: Deputy Chief Minister Ajit Pawardevendra fadanvisjayant patilMinister Eknath Shindepravin darekarprime minister narendra modiक्रांती दिनखानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीछगन भुजबळमहापौर किशोरी पेडणेकरमहाराष्ट्रमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

“कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नियमांचे कठोर पालन करावेच लागेल”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

शिवसेनेत आदित्य ठाकरेंच्या संयमी शैलीला तेजस ठाकरेंच्या आक्रमकतेची जोड मिळणार?

Next Post
thackeray

शिवसेनेत आदित्य ठाकरेंच्या संयमी शैलीला तेजस ठाकरेंच्या आक्रमकतेची जोड मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!