मुक्तपीठ टीम
चिपळूणला आलेल्या पुराने सगळी माती, चिखल, प्लास्टिक घरा घरात आणि इतरत्र पसरला. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या खूप संख्येने इथे आले. पूर ओसरल्यानंतर जागोजागी रस्त्यावर कचऱ्याचे, प्लास्टिक बाटल्यांचे खच दिसू लागले. सरकारी यंत्रणेने इतर भागातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पूरग्रस्त भागातील रस्त्यावरची माती,कचरा हलविण्याचे काम सुरू केले.राष्ट्र सेवा दलाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी चिपळूण येथील सरकारी विश्रामगृहापासून प्रांत ऑफिस पर्यंतचा हायवे वरच्या प्लास्टिक बाटल्या,पिशव्या उचलून रस्ता साफ केला आहे.
चिपळूण येथील खेर्डी येथे हे प्लास्टिक रिसायकलिंग करणारी एक संस्था आहे. त्यांच्या कडे हे प्लास्टिक सुपूर्द करणार आहे. अधून मधून पडणारा पाऊस,गाड्यांची सुरू असणारी वेगवान वाहतूक, यातून ही मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावरून सेवा दलाच्या या मुलं, मुली प्लास्टिक गोळा करीत होते तेव्हा येणारे जाणारे या कार्यकर्त्यांचे कौतुक करीत होते.
मुंबई गोवा चार पदरी रस्त्याचे खूप वर्षांपासून काम सुरू आहे.या पुराने ही माती घराघरात आली.रस्त्यावर माती,प्लास्टिक यांचा खच पडला.आज थोड्या फार प्रमाणात इथला प्लास्टिक,माती,कचरा उचलला गेला.पण भविष्यात अशा प्रकारचा कचरा,प्लास्टिक वशिष्ठी नदीच्या पात्रात जाणार नाही याची काळजी चिपळूणकरांनी घेतली पाहिजे, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाने केले आहे.