मुक्तपीठ टीम
कोरोना उपचारासाठी उपयुक्त असलेला नेजल स्प्रे लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स भारतीय कंपनीने सोमवारी स्प्रे बनवणाऱ्या कॅनेडियन कंपनी सॅनोटाईज रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी करार केला आहे. भारतासोबत कंपनी आता सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, तैवान, नेपाळ, ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम, श्रीलंका यासह आशियातील अनेक देशांना स्प्रेचा पुरवठा करणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ग्लेन सालदन्हा म्हणाले की, यामुळे आशियातील देशांमधील संसर्गाचा धोका कमी होईल.
नेजल स्प्रे कसे काम करतो?
- कॅनडाच्या व्हँकुव्हर येथील सॅनोटाईज या बायोटेक कंपनीने हे नायट्रिक ऑक्साईड नेजल स्प्रे (NONS) विकसित केले आहे.
- हा स्प्रे रूग्ण स्वतः त्यांच्या नाकात घेतात आणि यामुळे नाकातील संसर्गाचा धोका कमी होतो.
चाचण्यांमध्ये नेजल स्प्रेचे चांगले परिणाम
- कॅनडा आणि यूके मध्ये चाचण्या झाल्या आहेत. ७९ बाधितांवर दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्समध्ये, या नेजल स्प्रेने २४ तासांच्या आत ९५% आणि ७२ तासांच्या आत ९९% रुग्ण बरे केले.
- कॅनडातील दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स दरम्यान, १०३ लोकांना नेजल स्प्रे देण्यात आला.
- त्यामध्ये कोणीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला नाही.
- यूके फेज २ एनएचएस क्लिनिकल ट्रायल्समध्ये ७० लोकांचा समावेश होता. सर्व कोविड – १९ बाधित होते.
- अभ्यासातील इतरांना नाकात शिंपडलेल्यांपेक्षा १६ पट जास्त संसर्गाचा धोका होता.
- फेज-३ च्या चाचण्या भारतात होऊ शकतात.