Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

झिकाच्या रुग्णामुळे अलर्ट, आज केंद्रीय पथक बेलसरे गावात

August 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
zika virus

झिका अन्वेषण: राज्य शीघ्र प्रतिसाद पथकाची भेट


मुक्तपीठ टीम

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण ३० जुलै रोजी महाराष्ट्रात आढळला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालूक्यातील बेलसर गावात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. ती रुग्ण महिला आता बरी झाली असली तरी त्याची गंभीरतेने दखल घेत महाराष्ट्राच्या आरोग्यविषय शीघ्र कृती दलाच्या पथकाने या गावाला भेट दिली. आवश्यक उपाययोजनेला सुरुवात केली. केंद्र सरकारकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. झिका विषाणू आढळलेल्या बेलसर या गावाची तपासणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक येणार आहे.

 

केंद्राचं पथक आज महाराष्ट्रात

  • केंद्रीय पथकात तीन तज्ज्ञांचा समावेश
  • हे पथक बेलसर गावाची पाहणी करणार आहे.
  • कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं सर्वेक्षण करण्यासाठी पाठवलं आहे.
  • दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालय स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे.
  • बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.

 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण आहे.
बेलसर हे पुरंदर तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव असून या ठिकाणी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ताप रुग्ण आढळून येत होते. त्यातील पाच रुग्णांचे नमुने दिनांक १६ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे तपासण्यासाठी पाठविले असता त्यापैकी तीन जणांना चिकनगुनिया आजाराचे निदान झाले. दिनांक २७ ते २९ जुलै २०२१ या कालावधीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डेंग्य़ू चिकनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ चमूने बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ४१ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया तर ३ जणांना डेंग्यू आजार असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरून स्पष्ट झाले असून बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस विषाणु आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे.

 

राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाची बेलसर गावास भेट

३१ जुलै २०२१ रोजी डॉ.प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, डॉ. कमलापुरकर, सहाय्यक संचालक, हत्तीरोग आणि डॉ.महेंद्र जगताप, राज्य कीटकशास्त्रज्ञ या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथील कर्मचारी वृंद आणि पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करावयाच्या कार्यवाही बाबत अवगत केले.

 

झिका रुग्ण बरी!

बेलसर गावातील सदर झिका रुग्ण सध्या पूर्णपणे बरी झाली असून या महिलेस कोणतीही लक्षणे नाहीत तसेच तिच्या घरांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत.

झिका रोखण्यासाठी कार्यवाही

  • झिका रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर बेलसर गाव आणि परिसरात राज्य शीघ्र प्रतिसाद पथकाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे.
  • बाधित रुग्ण आणि गर्भवती महिलांना मच्छरदाणी वाटप करण्याबाबत ग्रामपंचायत बेलसर योग्य ती कार्यवाही तातडीने करत आहे.
  • गरोदर मातांची यादी करुन त्यांचे विशेष सर्वेक्षण करणे, भागातील मायक्रोसिफाली, गर्भपात आणि जन्मतः होणा-या मृत्यूंचे सर्वेक्षण करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे.
  • गावात स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे.

ताप रुग्ण सर्वेक्षण

  • झिका रुग्णाच्या पाच किलोमीटर त्रिज्येच्या अवकाशात येणाऱ्या आजूबाजूच्या एकूण सात गावांमध्ये घरोघरी भेटी देण्यात येत आहे.
  • ताप रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.
  • त्या संदर्भातील सूक्ष्म नियोजन करून येत्या तीन दिवसात या सर्व गावांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
zika virus 1
झिका अन्वेषण : तालुका स्तरीय कर्मचाऱ्यांची बैठक

कीटक शास्त्रीय सर्वेक्षण

  • झिका हा आजार डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराप्रमाणे एडीस इजिप्ती या डासांमुळे पसरतो.
  • याकरता बाधित क्षेत्रांमध्ये डास अळी घनता सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सांगण्‍यात आले आहे.
  • कीटकशास्त्र सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
  • कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात लोकसहभाग घेण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

एकात्मिक कीटक व्यवस्थापन

  • बाधित भागातील डासोत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी पुढील कृती योजना सुरु करण्यात आल्या आहेत:
  • पाण्याची डबकी बुजवणे
  • वाहती करणे
  • योग्य ठिकाणी गप्पी मासे सोडणे
  • तसेच घरगुती साठवलेल्या पाण्यामध्ये अळीनाशकाचा वापर करणे
  • बाधित भागात धुरळणी करणे

 

बेलसर गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करणे

  • सध्या या गावात तीन दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येते.
  • त्यामुळे पाणी साठवण्याची गरज पडल्याने डासोत्पत्तीस हातभार लागला आहे. अनेक घरांसमोर जमीनीखालील पाण्याच्या टाक्या आहेत.
  • या करिता गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

आरोग्य शिक्षण

  • कीटकजन्य आजार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध माध्यमातून जनतेचे प्रबोधन करण्यात येते आहे.
  • झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोविड सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही.
  • याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना अवगत करण्यात आले आहे.

Tags: coronapunezika virusकुटुंब कल्याण मंत्रालयकोरोनाझिका विषाणूपुणेबेलसर
Previous Post

“अतिवृष्टी व पुरामुळे हानी झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी २ हजार २२४ कोटींची आवश्यकता”

Next Post

बारावीच्या परीक्षेचा निकाल चारनंतर कसा आणि कुठे तपासाल?

Next Post
HSC

बारावीच्या परीक्षेचा निकाल चारनंतर कसा आणि कुठे तपासाल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!