मुक्तपीठ टीम
“मला जगभर उड्डाण करायचं आहे. त्यामुळे मुली मला पाहतील आणि या क्षेत्रात येण्याविषयी स्वत:च विचार करतील!” झारा रदरफोर्डचं हे विधान तिचं खरं लक्ष्य सांगतं. एखादा महासागर, एखादा खंड एवढंच नाही तर अगदी जगही पालथं घालायचं तिनं म्हटलं असतं तरी ते लक्ष्य छोटं ठरलं असतं. जेवढं महिलांना हवाई उड्डाणात आणण्याचं तिचं लक्ष्य मोठं आहे.
या महिन्यात १९ वर्षीय झारा रदरफोर्ड ही सर्वात कमी वय असणारी पायलट सोलो विमान उड्डाण करून विक्रम प्रस्थापित करेल. ११ ऑगस्ट रोजी हे अंतर पार केल्यानंतर, जगातील सर्वात वेगवान मायक्रोलाइट विमान उडविणारी ती पहिली सोलो पायलट स्त्री होईल. सध्या हा विक्रम ३० वर्षीय शेष्टा वेजच्या नावावर आहे. तिनं वयाच्या ३० व्या वर्षी एकटीने वेगवान मायक्रोलाइट विमानाचे उड्डाण केले आणि लांब अंतराचा पल्ला गाठला. झारा यानंतरही थांबणार नाही. तिला महिलांना आणखी पुढे आणखी पुढे नेण्यासाठी खूप काही करायचं आहे.
झारा हे अंतर पार केल्यावर इतर मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित हे विषय घेऊन यामधून पुढे जाण्यासाठी प्रेरित करणार आहे. अशी तिने माहिती दिली आहे. झारा सांगते की, “तिला जगभरात उड्डाण करायचे आहे. अशी तिची तिव्र इच्छा आहे. जेणेकरुन, मुली तिला पाहून या क्षेत्रात येण्याकरिता प्रेरित होतील आणि स्वतःसाठी काहीतरी विचार करतील.”
झाराच्या म्हणण्यानुसार, “विमान वाहतुकीच्या बाबतीत महिला आणि पुरुषांमध्ये फरक आहे. म्हणूनच माझे ध्येय मागील रेकॉर्ड तोडणे आणि पुढे जाणे आहे. जेणेकरून, माझ्यापासून प्रेरित होऊन इतर मुलीही माझा रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करतील. तसेच त्या एव्हिएशनमध्ये मुलांना मागे टाकू शकतीत. झाराची आई सेम आणि वडील बेट्रिस हेही पायलट आहेत. सेमने यांनी सांगितले की, “जेव्हा जेव्हा झाराने मला तिच्या योजनेबद्दल सांगितले, तेव्हा मला भीती वाटली. पण आता आम्हाला तिचा अभिमान आहे. मी कोणत्याही परिस्थितीत तिच्यासोबत आहे.” असे झाराची आई सेम या म्हणाल्या.