मुक्तपीठ टीम
आता कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेट नसले तरी चालेल. तरीही ग्राहकांना कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलेला ई-रुपी ही नवी डिजिटल पेमेंट सेवेमुळे हे सारं शक्य होणार आहे. आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहारांसाठी ई-रुपी इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर बेस्ड पेमेंट सिस्टीम लॉन्च केली.
डिजिटल करन्सीच्या दृष्टीने भारताचं पहिलं पाऊल मानली जाणारी ई-रुपी ही सेवा आहे तरी कशी ते जाणून घेऊया…
काय आहे ई-रुपी?
- ई-रुपी एक डिजीटल पेमेंट सुविधा आहे.
- ई-रुपी ही एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टम आहे.
- ई-रुपी क्युआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगच्या माध्यमातून काम करणारे ई व्हाऊचर आहे.
- या कार्डाचा वापर करुन डिजिटल पेमेंट आणि इंटरनेट बँकिंगसारखे व्यवहार करणे शक्य आहे.
- ई-रुपी एक प्रकारे ऑनलाईन चेक असेल, जो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकेल.
- ज्याला तो चेक वटवायचा आहे, तो मोबाईल क्रमांक आणि ओटीपी द्वारे ते पैसे आपल्या खात्यात घेऊ शकतो.
ई-रुपीचा वापर कुठे कुठे शक्य?
- नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं त्यांच्या युपीआय मंचावर, आर्थिक सेवाविभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्यानं विकसित केलं आहे.
- ई-रुपीचा वापर हा केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी केला जाऊ शकतो.
- ई-रुपी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप्स किंवा इंटरनेट बँकिंग न घेता व्हाऊचर वटवण्याची परवानगी देईल.
- मदर अँड चाईल्ड वेल्फेअर स्कीम, टीबी इरॅडिकेशन प्रोग्राम अंतर्गत देण्यात येणाऱी औषधे आणि पोषण आहार, तसेच आयुषमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, आणि फर्टिलायझर सबसिडी योजनेमधील सुविधांसाठीही ई-रुपीचा वापर केला जाऊ शकतो.
- यासोबतच, खासगी क्षेत्रातील कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना वेल्फेअर अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम अंतर्गत ही डिजिटल व्हाऊचर्स देऊ शकतात; असं सरकारने स्पष्ट केलं आहे