मुक्तपीठ टीम
१ ऑगस्टच्या महसूल दिनापासून महाराष्ट्रातील महसुली सेवांमध्ये एका क्रांतीची सुरुवात झाली आहे. आजवर राज्यात अनेक ठिकाणी जमिनीच्या खोट्या नोंदी आणि फसवाफसवीचे प्रकार समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा मिळू लागले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही मागिती दिली आहे.
आता महसूल सेवा डिजिटल!
- महसूल दिनापासून डिजिटल सेवांना सुरुवात.
- सहजता, पारदर्शकता आणि बिनचूक सेवेचा उद्देश.
- महसूलच्या सर्व सेवा ऑनलाईन असेल.
- आता सात बारा ऑनलाईन केला आहे.
- आता सातबारा नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे.
- त्यासाठी महसूल टीमला खूप काम करावे लागले.
- मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आली आहे.
- ई म्युटेशनसुद्धा पूर्ण होत आले आहे, लवकरच मिळेल.
- “सात बारा काढण्यासाठी फक्त १५ रुपये शुल्क लागेल.
महसूल सेवांच्या डिजिटलीकरणाचा फायदा
- चार ठिकाणी जर जमिनी असतील तर त्याचा एकत्रितरित्या एकच सातबारा मिळेल.
- ज्यांच्या सातबाऱ्यात २००८ पासून बदल झाले आहेत, त्यांचा सातबारा देखील नव्या डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.
- स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार
आज महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ केला. प्रामुख्याने नवीन सातबारा उतारा, संगणकीकृत अद्ययावत फेरफार, मिळकत पत्रिका या सेवा अधिक अचूक व गतीने ऑनलाईन रित्या उपलब्ध होणार आहेत. pic.twitter.com/n7FV4KiwTG
— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 1, 2021
लवकरच ई-पीक पाहणी सुरु होणार!
- “ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे.
- स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत.
- त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत.
- तलाठी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
- टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे.
- त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
- यामुळे पिकांची लागवड कळणार आहे.
- विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे.
आता खोट्या नोंदी करता येणार नाही!
- बँकांसोबत करार करणार आहे.
- बँक पण सात बारा काढू शकतील.
- त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतील.
- खोट्या नोंदी करता येणार नाही.
- फोटो आणि लोकेशन मिळेल.
- गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल.
- अडचणी आल्या तर त्या जाणून दूर करण्यावर विचार होईल.
- दोष समोर आले तर त्या त्या वेळी ते दूर केले जातील.
- यामुळे तलाठ्याचा वेळ वाचणार आहे.