मुक्तपीठ टीम
एकेकाळी भारतीय मनाला गारुड घालणारा स्कूटर ब्रँड म्हणजे बजाज. त्यांची चेतक, प्रिया हे सारेच मॉडेल भन्नाट लोकप्रिय होते. त्यासाठी वेटिंग लिस्ट असे. आता बजाजनं आपला बजाज चेतक नावानं ई-स्कूटर लाँच केली आहे. ती तशीच लोकप्रिय ठरत आहे. पहिला स्लॉट हाऊसफूल्ल झाल्यानंतर आता बजाज ऑटोने त्यांच्या ई-स्कूटर बजाज चेतकसाठी पुन्हा बुकिंग सुरू केली आहे.
पुणे आणि बंगळुरू या ठिकाणी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी आऊट ऑफ स्टॉक असल्यामुळे या ई-स्कूटरची बुकिंग बंद करण्यात आली होती. येत्या काळात कंपनी २२ शहरांमध्ये त्यांच्या या स्कूटरची विक्री करण्याची योजना आखत आहे. ही ई-स्कूटर नुकतीच नागपूरमध्ये लॉन्च करण्यात आली होती. याशिवाय म्हैसूर, औरंगाबाद आणि मंगळुरुमध्ये देखील स्कूटरची बुकिंग सुरू करण्यात आली होती.
चेतक ई-स्कूटरच्या पहिलं बुकिंग हाऊसफुल्ल!
- बजाज ऑटोने या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची बुकींग सुरू केली होती.
- तेव्हा केवळ २ दिवसांसाठी बुकिंग सुरू करण्यात आली होती.
- बजाजने चेतकला १ लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च केलं.
काय आहेत बजाज चेतकची वैशिष्ट्य?
- ही इलेक्ट्रिक स्कूटर अर्बन आणि प्रीमियम अशा दोन प्रकारांमध्ये येते.
- एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही इलेक्ट्रिक स्कूटर ९५ किमी पर्यंतची रेंज देते.
- पूर्ण सिंगल चार्जवर, ही इलेक्ट्रिक स्कूटर न थांबता ९५ किमीपर्यंत प्रवास करते. तर, इको मोडमध्ये या स्कूटरला केवळ ८५ किलोमीटरची रेंज मिळते.
- यात जुन्या लूकसह राऊंड डीआरएल देण्यात आलं आहे. तसंच यात सर्व डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहेत. हे आपण स्मार्टफोनला देखील कनेक्ट करू शकतो.
- परिणामी, कमी वेळेत ग्राहकांना सर्व माहिती मिळू शकते.
बजाज चेतकचं झटपट चार्जिंग!
- ही इलेक्ट्रीक स्कूटर एका तासात २५ टक्क्यापर्यंत चार्ज होते. तसेच पूर्ण चार्ज होण्यासाठी याला ५ तास लागतात.
- उत्तम राइडिंग अनुभवासाठी याला सिटी आणि स्पोर्ट असे दोन राईडिंग मोड देण्यात आले आहेत.
- यात ४.१ किलोवॅट इलेक्ट्रिक मोटर आहे, जी १६ Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ऑटोमॅटीक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.