मुक्तपीठ टीम
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पुरग्रस्त कोल्हापुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस कोल्हापुरात असण्याविषयी ठाकरेंना कळताच त्यांनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवून त्यांना थांबवले. एकत्रित दौऱ्याविषयी सुचवले. भेटीनंतर फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी कोल्हापुरातील नेहमीच्या पूर समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर चर्चा केली.
ठाकरे – फडणवीस भेट
- मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना शाहुपुरीतच थांबण्याचा निरोप दिला होता.
- शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचा निरोप कळवला.
- “वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया” असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेला.
- त्यानंतर फडणवीसांनीही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत, ते शाहुपुरीतच थांबले.
- दोन्ही नेते शाहुपुरीची पहाणी करत असताना एकमेकांसमोर आले.
- दोघांमध्येही काहीवेळ चर्चा झाली.
कोल्हापूर: शाहूपुरी भागात दौऱ्यावर असताना अनेक नागरिकांशी संवाद साधला. या भागात नागरिकांशी संवाद साधत असतानाच मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी हे सुद्धा तेथे आले असता पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांना सांगितल्या आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. #MaharashtraFloods pic.twitter.com/BctIZvnuwJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 30, 2021
कायमस्वरुपी उपाययोजनेवर चर्चा
- या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमची तिथं एवढीच चर्चा झाली की, या परिस्थितीवर काहीतरी कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे.
- तातडीची मदत तर तत्काळ दिलीच पाहिजे पण अशा घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना त्यावर काय होऊ शकेल? हा प्रयत्न केला गेला पाहिजे.
- तसेच, मी त्यांना सांगतिलं की त्यांनी जर बैठक बोलावली तर आम्ही यायला तयार आहोत.