मुक्तपीठ टीम
राज्याला अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाहणी दौरा करत आहेत. सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टोला लगावला आहे. राज्य सरकारने आता बहाणेबाजी बंद करावी. स्वत:ची जबाबदारी झटकून द्यायची, असं कसं चालेल? आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. महाविकास आघाडी सरकारनंही केंद्राकडे बोट करण्याऐवजी स्वत: मदत करावी, असे आव्हान फडणवीस यांनी केले आहे.
जलसंपदा खात्याचा अंदाज चुकल्यामुळेच यंदा अधिक नुकसान झालं. सां. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरस्थितीबाबत वडनेरे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांचा आघाडी सरकारवरच पलटवार
- फोन टॅपिंग झाले त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते.
- मग आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या सांगण्यावरुन कसं काम होऊ शकेल? असा सवालही फडणवीस यांनी केलाय.
- रश्मी शुक्ला यांच्या काळात भाजपच्या सांगण्यावरुन फोन टॅपिंग झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होत आहे.
- त्यावर फडणवीस यांनी हा प्रतिसवाल केला आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा – फडणवीस
- केंद्र सरकारनं ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे.
- ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
- केंद्राच्या या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 27 टक्के तर इडब्ल्यूएसच्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.
- देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.
- ऑल इंडिया कोट्यातून ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण मिळत नसल्यानं अनेक ओबीसी मुलं डॉक्टर होण्यापासून वंचित राहत होती.
- ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं फडणवीस म्हणालेत.
जयंत पाटलांना शुभेच्छा
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी काल मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून ब्रिच कँडी रुग्णालय गाठलं होतं.
- त्यानंतर आज त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली.
- आता त्यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती स्वत: पाटील यांनीच दिली आहे.
- त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी जयंत पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.