मुक्तपाठ टीम
देशात इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या नेक्सन ईव्ही या इलेक्ट्रिक कारला जगभरात चांगलीच पसंती मिळत आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी ग्राहकांना नेक्सन ईव्ही ही इलेक्ट्रिक कार उपयुक्त ठरणार आहे. स्पर्धात्मक युगात भारतात सर्वाधिक मागणी असणाऱ्यांपैकी नेक्सन ईव्ही ही एक इलेक्ट्रिक कार ठरली असून या कारची किंमत १३.९९ लाख ते १६.५६ लाख रुपये इतकी आहे.
- झिपट्रॉन ईव्ही तंत्रज्ञानाचा वापर करून टाटा नेक्सन ईव्ही कारला तयार करण्यात आले आहे.
- नेक्सन ईव्ही कारने एका वेळी ३१२ किमी पल्ला गाठण्यास मदत होऊ शकते.
- नेक्सन ईव्ही कार ही मॅग्नेट एसी मोटरद्वारे ३०.२ किलोवॅट क्षमतेच्या लिथिअम-आयन बॅटरीसह चालवण्यात येते.
- शिवाय कारच्या बॅटरीवर कोणत्याही प्रकारच्या पाणी अथवा धूळीचा परिणाम होणार नाही.
- २४५ एनएमची पीक टॉर्क जनरेट करणाऱ्या या इलेक्ट्रिक कारमध्ये पॉवरट्रॅन देण्यात आले आहे.
- कारमध्ये ८ वर्षापर्यंतची मुदत असणारी बॅटरी मॅनेटमेंट सिस्टम बसवण्यात आली आहे.
- तसेच उन्हाळी दिवसात एसयूव्हीच्या पॉवरट्रॅनला नॉर्मल ठेवण्यासाठी कूलिंग सर्किट बसवण्यात आले आहे.
- नेक्सन कारमधील बॅटरी ६० मिनिटांत ०-८० टक्के चार्ज होऊ शकते.
- होम वॉल बॉक्स चार्जरस शुल्क आकरून २०-८० टक्के चार्ज होण्यास ८ तास लागतात.
टाटा नेक्सन ईव्हीचे फीचर्स
- स्वयंचलित हवामान नियंत्रण
- इलेक्ट्रिक सनरूफ
- सात इंच इंफोटेनमेंट स्क्रीन
- ऑटो हेड लाइट्स
- ऑटो रेन-सेन्सिंग वाइपर
- इलेक्ट्रिक टेल गेट
- पार्क असिस्ट