मुक्तपीठ टीम
राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या आणि पाणी भरण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या धरणांत ४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच धरण हे जवळपास निम्मे भरले आहेत.
जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, धरणांमध्ये ४८ टक्के पाणीसाठा असून आठ दिवसांत १६ टक्के पाणीसाठा वाढून तो ४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यातील या विभागातील धरणांमध्ये सध्या इतका पाणीसाठा
- अमरावती – ४६.१५ टक्के
- औरंगाबाद – ३३.७३ टक्के
- कोकण – ५८.७ टक्के
- नागपूर – ३६. ४६ टक्के
- नाशिक – ३१.२७ टक्के
- पुणे – ६४.१५ टक्के
- एकूण सरासरी पाणीसाठा – ४८.४१ टक्के
मुंबई भागातील तलावातही पाणीसाठा वाढला
- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातही पाणीसाठा वाढला आहे.
- मुंबईत एप्रिलपर्यंतच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
- मुंबईतील तलावात सध्या ९,३६,९३३ दशलक्ष लीटर पाणी जमा झाले आहे.