मुक्तपीठ टीम
सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. कार, दुचाकी आणि स्कूटरनंतर आता लोकांना इलेक्ट्रिक सायकलीही खूप आवडतात. अमेरिकेची आघाडीची इलेक्ट्रिक सायकल निर्माता कंपनी रॅडरोव्हरने आपली नवीन सायकल रॅडरोव्हर-६ प्लस लॉन्च केली आहे. कंपनीच्या लाइनअपमधील ही अशी पहिली इलेक्ट्रिक सायकल आहे ज्यात सेमी-इंटिग्रेटेड बॅटरी वापरली गेली आहे.
ई-सायकल बॅटरीचं वेगळंपण
- या ई-सायकलची बॅटरी सहज बाहेर काढता येते आणि नंतर परत लावता येते.
- ही बॅटरी फ्रंट फ्रेममध्ये ठेवली गेली आहे.
- या इलेक्ट्रिक सायकलची किंमत अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत निश्चित केली गेली आहे.
- या बॅटरी १० एलईडी लाईट्ससह येतात.
- यामुळे आपण बॅटरीच्या चार्जिंगवर सहज नजर ठेवू शकतो.
ई-सायकलचे भन्नाट फिचर्स
- इलेक्ट्रिक सायकलला हायड्रॉलिक डिस्क ब्रेक
- नवीन एर्गोनोमिक फ्रेम
- इझी यूजर इंटरफेस
- कस्टम गिअर्ड हब मोटर
- तसेच एक पॉवरफुल सस्पेन्शन दिलेले आहे.
- रात्रीच्या वेळी मार्ग दिसण्यासाठी एक चांगला हॅलोलाइट दिला आहे.
- जो सायकल सुरू होताच चालू होते.
- त्याशिवाय त्यात फ्लॅट टायर्सही देण्यात आले आहेत जे पूर्णपणे पंक्चर प्रूफ आहेत.
बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज
- रेडरोव्हर ६ प्लस इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने ४८ व्ही आणि १४ एएच क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे.
- ही सायकल सिंगल चार्जमध्ये ७२ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल असा कंपनीची दावा आहे.
- ही सायकल सुमारे १२० किलो भार उचलण्यास सक्षम आहे.
- यात डिजिटल डिस्प्ले देखील आहे ज्यात आपल्याला स्पीडोमीटर, ऑडोमीटर, पॅडल असिस्ट, घड्याळ यासारखी माहिती मिळते.
- याशिवाय यामध्ये वॅट क्षमतेचे मीटरदेखील दिले गेले आहे.
- हेडलाइट-ऑन इंडिकेटर आपल्याला हेडलाइट चालू किंवा बंद आहे हे कळवून देते.
- या सायकलबरोबरच कंपनी काही अॅक्सेसरीजसुद्धा देते, ज्यात फ्रंट आणि रियर रॅक, यूएसबी चार्जर, बॅटरी ट्रॅव्हल, बॅटरी टर्मिनल कव्हर इत्यादी सर्व फीचर्स दिले आहेत.