मुक्तपीठ टीम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल. राज्यात ९ जिल्हे पुरामुळे बाधित झाली आहेत. मी सगळ्या जिल्ह्याची माहिती घेतली असून याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं अजित पवारांनी जाहीर केलं.
काय म्हणाले अजित पवार?
- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
- या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
- सांगलीच्या शिराळा, वाळवा आणि पलूस भागात मोठं नुकसान झालं आहे.
- सांगली, कोल्हापूर, रायगड, सांगली याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करतील.
- अनेक भागात रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
- तळीये गावाला मोठा फटका बसला आहे.
- साताऱ्यातील आंबेघर आणि मिरगावातही मोठं नुकसान झालं आहे.
- वायूदलाकडून जेवणाची पाकिटं वाटली जात आहे.
- नुकसानग्रस्त भागातील पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत.
- पाणी कमी झाल्यावर नुकसानाचा भाग अजून वाढणार आहे.
- त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
- कोयना धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात साडे सोळा टीएमसी पाणी जमा झाल आहे.
- रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला.
- त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली.
- मात्र, यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.
- शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या विविध मागण्या आहेत.
- अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करणार आहोत.
- मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
- केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चांगला समन्वय आहे.
- केंद्राकडूनही राज्याला मदत सुरु आहे.
- दोन नुकसानीची माहिती मिळेल.
- त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भारात रोगराईची शक्यता आहे.
- त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार असल्याची घोषणाही अजित पवारांनी केली आहे.