मुक्तपीठ टीम
खरं तर एसयूव्ही म्हटलं की ती कशी भलीमोठी दणकट अशीच आठवते. पण वाहतूकीच्या कमाल कोंडीच्या काळात गाडीही कशी अंग चोरून धावते. पार्किंगचंही एक आव्हानच असतं. बहुधा त्यामुळेच आता ह्युंडाई लवकरच नवीन मायक्रो एसयूव्ही बाजारात आणणार आहे. ‘ह्युंडाई’ची ही सर्वात छोटी एसयूव्ही असेल. तिचे नाव मायक्रो एसयूव्ही असेल. ही नवीन एसयूव्ही प्रथम कोरियामध्ये विक्रीस जाईल आणि त्यानंतर भारतीय बाजारात विक्री होईल. त्याच्या लांबीबद्दल बोलायचे झाल्यास ती टाटा नॅनोच्या ३०९९ मिमी लांबीपेक्षाही कमी असेल.
ह्युंडाईने कोरियात या एसयूव्हीचे कॅस्पर असे नाव ठेवले आहे. या मायक्रो एसयूव्हीची किंमत ५ लाख रुपये असू शकते. जी एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात कमी किंमत आहे.
एसयूव्हीचे नाव कॅस्पर असेल
- बाजारात ‘ह्युंडाई’ आपल्या कारला अनोखी नावे देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
- जसे क्रेटाला आयएक्स २५ तर काही देशांमध्ये वर्ना को सोलारिस किंवा एक्सेंट देखील म्हणतात.
- यामुळेच कोरियामधील मायक्रो-एसयूव्हीचे नाव कॅस्पर असेल.
मायक्रो एसयूव्ही कधी येणार?
- सप्टेंबरपर्यंत जागतिक बाजारात ही लॉन्च करण्यात येईल.
- त्यानंतरच ती इतर बाजारात आणि भारतीय बाजारात आणली जाईल.
- कॅस्पर ‘ह्युंडाई’ची सर्वात छोटी एसयूव्ही असेल, म्हणजे ती सब फोर मीटर व्हेन्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीपेक्षा लहान असेल.
- भारतातील सब फोर मीटर व्हेन्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये टाटा नेक्सन (७.१९ ते १३.२३ लाख रुपये), मारुती विटारा ब्रेझा (७.५१ ते ११.४१ लाख) आणि हुंडाई व्हेन्यू (६.९२ – ११.७८ लाख) यांचा समावेश आहे.
‘ह्युंडाई’ मायक्रो एसयूव्हीचा आकार किती?
- ‘ह्युंडाई कॅस्पर सुमारे १४२ इंच (३,५९५ मिमी) लांब, सुमारे ६३ इंच रुंद आणि सुमारे ६२ इंच उंच आहे.
- ‘ह्युंडाईची सर्वात छोटी एसयूव्ही थोडीशी लहान आणि संकुचित असेल.
- तर त्याची सर्वात छोटी एसयूव्ही सॅन्ट्रो हॅचबॅकपेक्षा उंच असेल.
- जी ३६१० मिमी लांब, १६४५ मिमी रुंद आणि १५६० मिमी उंच आहे.
मायक्रो एसयूव्हीची स्पेसिफीकेशन्स
- कॅस्परमध्ये १.२ लीटर, फोर सिलेंडर एस्पिरेटेड इंजिन दिले जाईल जे ग्रँड आय १० निओसला सपोर्ट करते.
- ‘ह्युंडाई कॅस्पर टाटा एचबीएक्स मायक्रो-एसयूव्ही, मारुती सुझुकी इग्निस आणि महिंद्रा केयूव्ही १०० सारख्या हाय रायडिंग हॅचबॅकसह स्पर्धा करू शकते.