मुक्तपीठ टीम
आता लवकरच स्पेस वेडिंगचे स्वप्नही साकारता येईल. स्पेस बलूनमध्ये बसून १ लाख फूट उंचीवर लग्न करता येणार आहे. अमेरिकेतील फ्लोरिडास्थित स्पेस पर्स्पेक्टिव्हने एक खास प्रकारच्या स्पेस बलूनची रचना केली आहे. त्याचा आकार बऱ्यापैकी मोठा असेल. एकदा स्पेस बलूनमधून प्रवास करण्यासाठी ९३ लाख रुपये द्यावे लागतील. २०२४ पासून हा प्रवास करता येईल.
अनेकांनी केले बुकिंग
- बर्याच लोकांनी या प्रवासासाठी बुकिंगही केलेले आहे. अशी कंपनीने माहिती दिली आहे.
- त्याच वेळी, काही लोकांनी लग्नासाठी स्पेस बलूनला निवडले आहे.
- स्पेस बलूनमध्ये एकावेळी ८ लोकांना प्रवास करता येणार आहे.
- हा प्रवास ६ तासांचा असेल. यासाठी अॅडव्हान्स बुकिंग जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाले आहे.
- कंपनीच्या मते, हे कॉर्पोरेट कार्यक्रम आणि वाढदिवसासारख्या उत्सवांसाठी देखील बुक केले जाऊ शकते.
बलून प्रवासात काय मिळणार?
- स्पेस बलूनमधून प्रवास करताना, आपण पृथ्वीला ३६० अंशांवर पाहू शकाल.
- बलूनमध्ये आंघोळीसाठी स्नानगृह तसेच बार आणि वाय-फाय सुविधा देखील असेल.
- त्याच्या निश्चित उंचीवर पोहोचल्यावर, चारी बाजूनी ७२५ किमी पर्यंत पाहिला जाऊ शकतो.
- उड्डाण दरम्यान नाश्ता आणि कोल्ड ड्रिंक ऑर्डर करता येणार.
जूनमध्ये चाचणी, २०२४पर्यंत बुकिंग फूल!
- यावर्षी जूनमध्ये बलूनची चाचणी केली होती.
- हे बलून नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर जवळील स्पेस कोस्ट स्पेसपोर्ट येथून लॉन्च केले गेले.
- या बलूनला नेपच्यून वन असे नाव देण्यात आले आहे.
- २०२४ पर्यंत स्पेसफ्लाइटसाठी बुकिंग केले गेले आहे.
- आता २०२५ पर्यंत बुकिंग होत आहे.
- बुकिंग थेट कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन करता येते.
भविष्यात अंतराळात जाणे हे अगदी युरोप ट्रीपला जाण्यासारखे असेल. यासाठी कोणतेही विशेष कपडे घालण्याची गरज नाही. त्यात बसणे म्हणजे विमानात बसण्यासारखे असेल. त्याचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक असेल, असे सांगितले जाते. तसं झालं तर मग काय लाँग ड्राइव्हवर जायचं तर तेही थेट अवकाशातच!