मुक्तपीठ टीम
सध्याच्या डिजिटल काळात आता गॅस सिलिंडरची बुकिंग करणे सोपे झाले आहे. आता तुम्ही घर बसल्या गॅस सिलिंडर बुकिंग करू शकता. जर तुमच्या मोबाईल मध्ये पैसे नसतील तर व्हॉट्सॲपचा यूज करून गॅस सिलिंडर ची बुकिंग करू शकता. भारतातली सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनीसारखे भारत गॅस, इंडियन ऑईल आणि एचपी गॅस ग्राहकांना व्हॉट्सॲप वरून सिलिंडर बुक करण्याची सर्व्हिस दिली आहे.
बुकिंग करण्याची योग्य प्रक्रिया
१. आता तुम्ही मिस्ड कॉल देऊन सुध्दा गॅस सिलिंडर बुक करू शकता.
२. यासाठी इंडियन एलपीजीचे ग्राहक ८४५४९५५५५५ वर, बीपीसीएल चे ग्राहक ७७१०९५५५५५५ वर आणि एचपी ग्राहक ९४९३६०२२२२ मिस्ड कॉल देऊ शकतात.
एचपी ग्राहक व्हॉट्सॲपच्या मदतीने करू शकतात सिलिंडरची बुकिंग
एचपी ग्राहकांनी हा नंबर ९२२२२०११२२ मोबाईलमध्ये सेव्ह करावा. या नंबरला सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सॲप करा आणि सेव्ह केलेला नंबर उघडा. नंबर रजिस्टर्ड केल्यानंतर व्हॉट्सॲप वर ऑर्डर माहिती येतील. यात सिलिंडर ची डिलीवरी डेट सहित पूर्ण माहिती लिहिलेली असेल.
भारत गॅस ग्राहक अश्या प्रकारे व्हॉट्सॲप वर बुक करा सिलिंडर
भारत गॅसच्या बुकिंगसाठी तुम्हाला मोबाईल मध्ये १८००२२४३४४ नंबर सेव्ह करावा लागेल. नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲप वर जावे लागेल. यानंतर सेव्ह केले गेलेले भारत गॅस म्हणजे भारत पेट्रोलियम स्मार्ट लाइन नंबर उघडा. त्यानंतर व्हॉटसॲप वर हाय, हॅलो, लिहून पाठवा. लगेच रिप्लाय येईल. ज्यात व्हॉट्सॲपवर एजेंसीद्वारे स्वागत केले जाईल. सिलिंडर जेव्हा पण बुक करायचा असेल तेव्हा व्हॉट्सॲप वर बुक लिहून पाठवा. बुक लिहून पाठवले की तुम्हाला ऑर्डर डिटेल मिळेल आणि काही दिवसात सिलिंडर मिळेल.
नंबर रजिस्टर केल्यानंतरच या सुविधेचा लाभ घेता येणार
व्हॉट्सॲप आणि मिस कॉलच्या मदतीने सिलिंडर बुक करण्याची सुविधा फक्त त्याचं नंबर वर मिळेल जो नंबर तुमच्या एजेंसीमध्ये रजिस्टरअसेल. रजिस्टर न करता तुम्ही सिलिंडर ची बुकिंग करू शकत नाही.