मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशमधल्या देवरिया येथे एका काकानेच आपल्या पुतणीची निघृण हत्या केली आहे. जीन्स घालणे काकाला आवडत नव्हतं. पुतणीला सांगूनही तिने ऐकलं नाही. काकाने तिला मारहाण करुन हत्या केली. मुलीच्या वडीलांनीही याला पाठिंबा दिला आहे. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते नदीवर गेले. पुलावरुन मृतदेह खाली फेकत असताना, मुलीचा पाय रेलिंगमध्ये अडकला. यामुळे नदीत पडण्याऐवजी मृतदेह पुलावरच लटकला.
हे पाहून आरोपी काका आणि वडील घाबरले आणि पळून गेले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी काका अरविंद आणि वडील परमहंस यांना अटक केली. याप्रकरणी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
- २ दिवसांपूर्वी जीन्स घालण्यावरुन वाद झाला.
- गुरुवारी पोलिसांनी या हत्येचा खुलासा केला.
- महुआडीह पोलीस ठाणे परिसरातील संवरेजी खार्ग येथे राहणारे अमरनाथ पासवान पंजाबच्या लुधियाना येथे नोकरी करतात.
- मुलीची आई शकुंतला देवी यांनी सांगितले की, १६ वर्षाची मुलगी नेहा काही दिवसांपूर्वी लुधियानाहून गावी आली होती. ती येथे शहरात मुली राहतात त्याप्रमाणे जीन्स घालायची.
- नेहाला तिच्या काका आणि वडिलांनी अनेकदा जीन्स घालण्यास रोखले. परंतु, तिने ऐकले नाही. ती सहमत नव्हती.
- नेहाला दोघांनीही खूप मारहाण केली. भिंतीवर आदळल्यानंतर डोक्याला मार बसला. यामुळे नेहाचा मृत्यू झाला.
- घरातील इतर लोकांनीही या मारहाणीला पाठिंबा दिला.
- मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह फेकून देण्यासाठी वडील , काका पटनवा पुलाजवळ देवरिया कसया रोड येथे घेऊन गेले.
- जुन्या लोखंडी पुलावरून त्यांनी मृतदेह नदीत फेकण्याचा प्रयत्न केला.
- पुलाच्या रेलिंगमध्ये नेहाचा एक पाय अडकला आणि तो मृतदेह तिथेच अडकला. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला.
- १० जणांविरोधात गुन्हा दाखल तर दोघांना अटक करण्यात आलीय.
- महुआडीहचे पोलीस राम मोहन राम यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीची आई शकुंतला देवी यांनीच मुलीच्या हत्येची तक्रार दिली.
- तक्रारीरवरुन पोलिसांनी अरविंद, व्यास, परमहंस, भागणा, गुड्डी, पूजा, पन्ने लाल, राहुल आणि चालक हस्नेन यांच्यासह १० जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा आणि पुरावा लपवण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
- दोन जणांना अटकही करण्यात आली आहे.
पोलीस सीमा वादात अडकले
१. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मृतदेह रेलिंगमधून लटकत असल्याचे समजताच कारखाना पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
२. घटनास्थळ दुसर्या भागात असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तरकुलहा पोलिसांना कळविले.
३. पोलीस दोन सीमेवरील वादात अडकले होते. येथे मुलीचा मृतदेह ३ तास लोखंडी रेलिंगमधून लटकत राहिला.
४. तीन तासानंतर तरकुलहा पोलिसांनी मृतदेह खाली आणला. त्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.