Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिद्धार्थ चांदेकर – मिताली मयेकर जोडीची ‘हौस हजबंड’ कथा स्टोरीटेल मराठीवर!

'हौस हजबंड' ऑडिओ सिरीजद्वारे लग्नानंतर सिद्धार्थ - मिताली प्रथमच एकत्र!

July 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
storytel

मुक्तपीठ टीम

लाखो तरुणींच्या हृदयांची धडकन वाढविणारा चॉकलेट बॉय अर्थात गोड गुलाबजाम सिद्धार्थ चांदेकर आणि बोल्ड अँड ब्युटीफुल मिताली मयेकर या मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॉट जोडीनं अलीकडेच लग्न केले आणि कित्येकांचे हार्ट ब्रेक झाले. पण आता त्यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘स्टोरीटेल मराठी’ या जगविख्यात ऑडिओबुकने खास नव्याने तयार केलेल्या त्यांच्या ओरिजनल ऑडिओबुक सिरीजमध्ये हे दांपत्य लग्नानंतर प्रथमच एकत्र आले आहेत. ‘ हौस हजबंड'(Haus Husband) असं नाव असलेली हि ओरिजनल धम्माल ऑडिओ सिरीज ‘स्टोरीटेल मराठी’ने तयार करून नवा पायंडा रचला आहे.

 

रोहित आणि रेवा… आत्ताच लग्न झालेलं, एकमेकांच्या सुपर प्रेमात असलेलं एक कपल… एकदम गुटर्रर्रर्रगूं! पण त्यांच्या नवरा बायकोच्या रोलबद्दलच्या concepts जरा उलट्यापालट्या आहेत… पण आजूबाजूची जालिम दुनिया त्यांना पाहिजे तसं जगू देत नाही. घरात येणाऱ्या मदतनीस ताईंपासून ते पार्कातल्या काकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपासून ते दोघांच्या सासवांपर्यंत… सगळे मिळून या दोघा बिचाऱ्यांना सॉलिड सासुरवास उर्फ मेंटल टॉर्चर करतायत… तर अशा वेळी त्यांची दोघांची टीम सॉलिड राहते का? त्यांच्यात जालिम दुनिया फूट पाडते? रेवाचा स्वयंपाक आणि रोहितचा जॉब या किश्श्याचं नेमकं काय होतं? त्याची एक सॉलिड रोमँटिक यूथफुल गोष्ट म्हणजेच ‘स्टोरीटेल मराठी’ची ‘ हौस हजबंड'(Haus Husband).

 

‘फिरंग’ सीजन १, २ तसेच ‘तो ती आणि तिचा’ सीजन १, २ या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘स्टोरीटेल मराठी’च्या ओरिजनल रंगतदार रोमॅंटिक ऑडिओबुक सिरीजच्या यशस्वी निर्मितीसोबतच या नव्या माध्यमाशी एकरूप झालेल्या चतुरस्र युवा लेखिका गौरी पटवर्धन यांच्याच लेखनीतून ‘हाऊस हजबंड'(Haus Husband) उतरले आहे. आधीच्या दोन्ही सिरीजप्रमाणेच या सीरिजलाही साहित्यप्रेमी प्रचंड प्रतिसाद देतील असा विश्वास ‘स्टोरीटेल मराठी’ला आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांद्वारे उत्तम अभिनय कौशल्यामुळे सिद्धार्थ मितालीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच आता ते आपल्या आवाजाच्या जादूनेही रसिकांना घायाळ करणार आहेत.

 

लोखो प्रेक्षकांना आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या या रोमॅंटिक दांपत्याच्या वैवाहिक आयुष्याशी साधर्म्य सांगणाऱ्या ‘हौस हजबंड'(Haus Husband) मध्ये नेमका दडलंय काय याचा शोध घेण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्यारसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठीसह सर्व ११ प्रादेशिक भाषेमधील पुस्तके योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.


Tags: Haus HusbandSTORYTELमिताली मयेकररोमॅंटिक ऑडिओबुक सिरीजलेखिका गौरी पटवर्धनसिद्धार्थ चांदेकरस्टोरीटेल
Previous Post

बंगाल जिंकले, ममतांची नजर आता दिल्लीवर!

Next Post

नाना पटोलेंच्या स्वबळाला राहुल गांधींचं बळ! काँग्रेस एकट्यानंच लढणार!!

Next Post
nana patole (3)

नाना पटोलेंच्या स्वबळाला राहुल गांधींचं बळ! काँग्रेस एकट्यानंच लढणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!