मुक्तपीठ टीम
सोशल मीडियावरील प्रोफाईलला भाळली आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवली गेली. सध्या अशा फसवणुकीच्या कहाण्या नव्या नाहीत. वासनांध लांडगे अशा तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवून शोषण करतात आणि वापरून वस्तूसारखे फेकतात. ताजं उदाहरण मुंबईतील एका तरुणीचं आहे. राजस्थानमधील एका प्राध्यापकानं तिला सोशल मीडियावर मैत्री करत उदयपूरला बोलावलं. तेथे गेल्यावर रिसॉर्टवर त्या प्राध्यापकाने खरं रुप दाखवलं. त्याने तिच्यावर बलात्कार केला.
- राजस्थानच्या गोगुंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पीडित मुलीने सांगितले की तिची सोशल मीडियावर उदयपूर येथे राहणाऱ्या प्राध्यापकाशी मैत्री झाली.
- काही दिवसातच त्यांच्यातलं बोलणं वाढलं.
- यानंतर प्राध्यापकाने पीडित तरुणीला ९ जुलै रोजी उदयपूर येथे बोलावले.
- यानंतर, त्याने तिला गोगुंडा परिसरातील रिसॉर्टमध्ये नेले.
- येथे मादक पदार्थ मिसळून तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला.
- त्यानंतर पुन्हा त्याने तसे करताच, पीडितेने विरोध दर्शविला असता त्या आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले.
- पण काही दिवसानंतर या तरूणाने पीडितेला मुंबईला पाठवले.
- त्यानंतर हा तरुण ना फोन उचलत आहे ना लग्न करत आहे.
- त्यामुळे अखेर यानंतर तरुणीने प्राध्यापकावर गुन्हा दाखल केला.
त्याचवेळी गोगुंडा पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रवीण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची तक्रार मुंबईहून ईमेलद्वारे नोंदविण्यात आली आहे. आता पीडितेला बोलावून तिची जबानी नोंदवली जाईल. त्यानंतर पुढील तपास करुन कारवाई केली जाईल.
तरुणींसाठी सोशल मीडियासाठी धोक्याचा अलर्ट!
- सोशल मीडियावर अनेकदा फेक प्रोफाईलही खूप असतात.
- काही खरे प्रोफाईल असणाऱ्यांचीही वृत्तीही दुसऱ्यांना माहिती नसते.
- सोशल मीडियावर मैत्री करताना जसे चांगले तेच फोटो प्रोफाईल फोटो बनवले जातात, तसेच आपली चांगलीच बाजू मांडली जाते.
- त्यामुळे तरुणींनी कुणावरही केवळ सोशल मीडिया मैत्रीवर विश्वास ठेवू नये.
- सोशल मीडियावर झालेली अशी मैत्री विश्वासाची मानून अशा पुरुषांना अन्यत्र भेटण्यास जाऊ नये.
- अशा प्रत्येकाची माहिती कुटुंब, मित्र-मैत्रीणी यांच्याशी शेअर करावी.
- घरच्यांच्या सल्ल्याने, परवानगीनेच पुढचे नाते वाढवावे.