मुक्तपीठ टीम
फॅशन ट्रेंड ते मनोरंजन आणि बातमी ते वैज्ञानिक संशोधन आदी सर्व प्रकारची माहिती स्वरुपातले व्हिडिओ बघण्यासाठी आपण युट्यूबची मदत घेतो. पण युट्यूबचे हे नवीन फिचर तुम्हाला माहिती आहेत का?
युट्यूब लवकरच आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फिचर लाँच करणार आहे. या फिचरद्वारे यूजर्सना चालू व्हिडिओमध्ये दिसणार्या जाहिरातीमधून थेट वस्तू खरेदी करता येईल. म्हणजेच, आता युट्यूब यूजर्सना व्हिडिओ दरम्यान दिसणार्या वस्तूंसाठी इतर कोणत्याही शॉपिंग वेबसाइट शोधण्याची आवश्यकता नाही. व्हिडिओ पाहताना यूजर्सना एखादी वस्तू आवडत असल्यास, त्याच वेळी ऑनलाइन शॉपिंग देखील केले जाऊ शकते. शॉपिंग बॅगचे आयकॉन व्हिडिओच्या मध्यभागी यूजर्सना दिसेल. ज्यावर क्लिक करुन खरेदी करता येईल.
युट्यूब सध्या या फिचर्सचा प्रयोग अमेरिकेत काही अँड्रॉइड, आयओएस आणि वेब यूजर्सवर करत आहेत. या सुविधेची युट्यूबची चाचणी गूगल सपोर्ट पेजवर शेअर केली गेली आहे. युट्यूबच्या मते, यूजर्सला व्हिडिओद्वारे वस्तू खरेदी करण्याचा पर्याय दिला जाईल. अशा प्रकारे, कंपनी शॉपिंग चॅनेलसारखे आपले प्लॅटफॉर्म विकसित करण्यास सक्षम असेल.
असे करू शकता युट्यूबवर शॉपिंग
– युट्यूब व्हिडिओमध्ये यूजर्सना शॉपिंग बॅग आयकॉन व्हिडिओच्या खाली डाव्या कोपर्यात मिळेल.
– त्याच्या मदतीने यूजर्स वस्तू पाहू शकतात.
– आपल्याला युट्यूब वर दिसणार्या वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाइटवर जाण्याची आवश्यकता नाही.
– युट्यूबचे नवीन शॉपिंग बटण आल्यामुळे हे कार्य अधिक सुलभ होईल.