मुक्तपीठ टीम
राज्यातील खासगी आणि अनुदानित शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता आवश्यक प्रशिक्षणाच्या स्वरूपात कालानुरूप व सुसंगत बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार सुधारणा करण्यात आल्या आहेत.
शासन निर्णय :
संदर्भाधिन क्र.१ मधील शासन निर्णयातील परिच्छेद ९ मधील १ (क) आणि २(व) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
१ (क) त्याने/तिने विहित केलेले किमान तीन आठवड्यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासाचे (Online) सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
२ (ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे. अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
उपरोक्त दहा दिवसांच्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत करण्यात येईल. २.
३. प्रशिक्षणाचे शुल्क शासन मान्यतेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे निर्धारित करेल.
४. वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षण शासन स्तरावरून आयोजित न केल्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत सदर दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना वरिष्ठ/निवड श्रेणीसाठी पात्र दिनांकापासून लाभ देय राहील.
५. दि.३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणा-या अथवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र असणा-या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटींमधून सवलत देण्यात येत आहे.