मुक्तपीठ टीम
मुंबई पोलिसांनी पॉर्न व्हिडीओंच्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक केली. या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. एकीकडे एका अभिनेत्रीनं नग्नावस्थेत ऑडिशनसाठी सक्ती केल्याच्या आरोपासह तीन अभिनेत्रींचे आरोप कुंद्राच्या अटकेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. दुसरीकडे पॉर्नच्याच गुन्ह्यात अटक झालेली अभिनेत्री गेहाना वशिष्ठच्या वतीने जारी करण्यात आलेलं निवेदन या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळा दृष्टीकोन मांडणारे आहे. गहेनाने मुंबई पोलिसांवर विश्वास व्यक्त करतानाच पॉर्न आणि एरोटिक म्हणजे उत्तेजक व्हिडीओमधील फरक समजून घेण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हणाली गहेना वशिष्ठ?
- ‘कायदा त्याच्या स्वत: च्या मार्गाने कार्य करेल.
- आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे.
- मुंबई पोलीस दल हे जगातील सर्वोत्तम फोर्स आहे.
- सुनावणीनंतर खरा दोषी कोण आहे ते न्यायालय ठरवेलच.
- तसेच ज्यांना अटक झाली आहे, त्यांना दुसरे वापरून घेत आहेत.
एकीकडे गहेना राज कुंद्राला मदत होईल असं विधान करत आहे. तर दुसरीकडे काही अभिनेत्रींचे जुने आरोप आता पुन्हा चर्चेत आले आहेत.
तीन अभिनेत्रींचे राज कुंद्रावर आरोप
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रानेच तिला एडल्ट फिल्मच्या क्षेत्रात आणल्याचे आधीच म्हटले आहे. एक प्रकारे तिने त्यासाठी राजला जबाबदार ठरवले.
- पूनम पांडेने तर तिच्या मर्जीविरोधात तिचे व्हिडीओ वापरल्याची तक्रारही केली.
- सर्वात गंभीर आरोप अभिनेत्री सागरिका शोना सुमनने माध्यमांसमोर येऊन केला होता.
- तिने राज कुंद्रावर नग्नावस्थेत ऑडिशन्स देण्याची मागणी केल्याचा आरोप केला होता.
सागरिकाचे शोनाचे गंभीर आरोप
सागरिका शोना म्हणाली की “मी एक मॉडेल आहे आणि मी गेल्या तीन-चार वर्षांपासून या उद्योगात काम करत आहे. मी जास्त काम केलेले नाही. लॉकडाऊन दरम्यान माझ्याबरोबर घडलेल्या काही गोष्टी मला उघड करायच्या आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये मला उमेश कामतचा फोन आला आणि मला राज कुंद्रा तयार करणार असलेल्या वेब सिरीजची ऑफर दिली. जेव्हा मी त्यांना राज कुंद्राबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ते शिल्पा शेट्टी यांचे पती आहेत.
‘व्हिडिओ कॉलवर ऑडिशनच्या नावाखाली मला न्यूड ऑडिशनच्या ऑफर आल्या आहेत. हे तीन लोक होते. त्यापैकी एक उमेश कामत होता. एकाचा चेहरा दिसत नव्हता पण तो बहुधा राज कुंद्रा होता. कारण उमेश कामत हे राज कुंद्राचे नाव घेत होते की सध्या चालू असलेल्या सर्व साइटचे ते मालक आहेत. माझी मागणी आहे की त्यांना अटक करावी. त्यांना अटक का केली जात नाही? त्यांच्याकडे बर्याच साइट चालू आहेत. मला वाटते की तेथेच मुख्य दुवा आहे.
त्यावेळी सागरिकाच्या आरोपांनंतर राज कुंद्रा यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की कोणीही कोणालाही दोष देऊ शकेल, याचा अर्थ ती बातमी आहे असे नाही.