Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज कुंद्रा आणि ‘मुंबई ते लंडन’ पॉर्नचा गंदा धंदा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shilpa

मुक्तपीठ टीम

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशिरा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक केली. राज कुंद्रावर पॉर्न फिल्म बनवून ते अॅपवर प्रकाशित केल्याचा आरोप आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे यालाही अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्या दरम्यान त्याच्याकडून पॉर्नच्या गंदा असणाऱ्या धंद्याची थेट चौकशी करण्याची संधी पोलिसांना मिळणार आहे. या चौकशीत आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

पॉर्नचा गंदा धंदा, कसा झाला राज कुंद्राचा वांधा?

  • यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी मढ बेटावरील बंगल्यांमधून चालणाऱ्या एका पॉर्न रॅकेटचा छडा लावला होता.
  • त्या गुन्ह्यात एका अभिनेत्रीसह आठजणांना अटक करण्यात आली होती.
  • बॉलिवूडमध्ये येऊ पाहणाऱ्या फ्रेशर्स अभिनेत्रींना फसवून ऐन शुटिंगच्या दिवशी भलतंच स्क्रिप्ट त्यांना दिले जात असे.
  • त्यांनी ते पॉर्न करण्यास नकार दिला तर शुटिंगचे संपूर्ण बिल भरण्यासाठी दबाव आणला जात असे.
  • पोलिसांना तपास करताना त्यात कामत नावाचा आरोपी सापडला.
  • कामतच्या चौकशीत ब्रिटनधील केनरिन प्रोडक्शन हाऊस ही कंपनी आणि त्यातील राज कुंद्राचे कनेक्शन समोर आले.
  • पोलिसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान पोलिसांना राज कुंद्रा अडमिन असलेला एक एच ग्रुप सापडला.
  • त्यावरील पॉर्न फिल्म, अॅपच्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदीमुळे राज कुंद्राविरोधात पुरावेही मिळाले.
  • त्यानंतर पोलिसांनी अखेर राज कुंद्राला अटक केली.

 

कसा चालायचा राज कुंद्राचा धंदा?

  • राज कुंद्राने पॉर्नच्या धंद्यात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे, असा आरोप आहे.
  • त्यांचे एक अॅपहा आहे, पण ते त्यांचे नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
  • आर्म्सप्राइम मीडिया, केनरिन प्रॉडक्शन हाऊस अशा अनेक कंपन्या आहेत.
  • त्यांची कंपनी पूनम पांडेसारख्या पॉर्न सेलिब्रिटींची व्यावसायायिक कामेही हाताळत असते.
  • भारतात व्हिडीओंचे शूटिंग करून ते वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला पाठवले जात असे.
  • राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी ब्रिटनमध्ये राहतात.
  • त्यांची ब्रिटनमध्ये केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी आहे.
  • प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत.
  • त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे.
  • राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता.
  • ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे काम आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

कोण आहे रायन थोरोपे?

  • रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा जवळच्या वर्तुळातील मानला जातो.
  • रायन अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांसोबत आहे.
  • राज कुंद्राने रायनवर पॉर्न व्हिडीओंची तांत्रिक जबाबदारी सोपवली होती.
  • पॉर्नचे हे रॅकेट मुंबई ते लंडन कसे चालते, याविषयी रायनला सर्व माहिती होती.

 

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वादांची मालिका…


Tags: raj kundrashilpa shettyपॉर्नराज कुंद्राशिल्पा शेट्टी
Previous Post

शेकडो लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांनी केला गौरव

Next Post

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वादांची मालिका…

Next Post
shilpa shetty

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वादांची मालिका...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!