मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत म्हणजेच नाबार्ड येथे असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ए) (आरडीबीएस) या पदासाठी १४८ जागा, असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ए) (राजभाषा) या पदासाठी ५ जागा, असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ए) (पी अॅन्ड एसएस) या पदासाठी २ जागा, मॅनेजर (ग्रेड बी) (आरडीबीएस) या पदासाठी ७ जागा अशा एकूण १६२ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
• पद क्र.१- ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ बीइ/ बी.टेक/ एमबीए/ बीबीए/ बीएमएस/ पी.जी. डिप्लोमा/सीए
• पद क्र.२- ५०% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
• पद क्र.३- तो/ ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात/ नौदल/ हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेचे अधिकारी असावी
• पद क्र.४- १) ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी २)३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ४० वर्ष असावे.
शुल्क
• पद क्र. १ आणि २ साठी जनरल/ओबीसी उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाईल.
• पद क्र.३ साठी जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क एससी/एसटी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल.
• पद क्र.४ साठी जनरल/ओबीसी उमेदवारांकडून ९०० रूपये शुल्क तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाईल..
अधिक माहितीसाठी
नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट https://www.nabard.org/ वरून माहिती मिळवू शकता.