मुक्तपीठ टीम
आपल्याकडे राजकारणी म्हटलं की तो आणखीही काही करत असेल असं वाटतच नाही. भारतात राजकारण हा फुलटाइम धंदा मानणाराही एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे स्वाभाविकच तसा समज असावा. पण अनेक राजकीय नेते वेगळे आहेत. स्वत:ची राजकीय जबाबदारी निभावतानाच ते व्यावसायिक कर्तव्याकडेही डोळेझाक करत नाहीत. भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी हे अशांपैकीच एक!
राजीव प्रताप रुडी यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते पायलटच्या गणवेशात दिसत आहेत. त्या विमानात संसदीय समितीचे सदस्य खासदार उपस्थित होते. कॅप्टन म्हणून रुडी यांनी सर्व प्रवाशांचे स्वागत केले आणि प्रवास करणाऱ्या सर्वात लहान प्रवासी असलेल्या मुलीची ओळखही करून दिली. ही मुलगी भाजपा खासदार मनोज तिवारी यांची ६ महिन्यांची मुलगी संविका होती.
व्हिडीओमध्ये रूडी असे म्हणत आहे की, “हा प्रवास भारताच्या इतिहासात खूप खास आणि अनोखा असणार आहे. हा एक अतिशय सुंदर दिवस आहे.”
रुडींच्या विमानात होते तरी कोण कोण?
• संसदीय समितीचे अध्यक्ष व्यंकटेश
• बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी
• उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत
• भाजपचे खासदार मनोज तिवारी
• असे बरेच खासदार आणि त्यांचे कुटुंबीय या विमानात उपस्थित होते.
डिएमकेचे नेते दयानिधी मारन यांचा अविस्मरणीय विमान प्रवास
- १३ जुलै रोजी डीएमकेचे नेते दयानिधी मारन यांनी दिल्ली ते चेन्नईपर्यंतचा विमान प्रवास केला होता.
- त्यांच्यासाठी हा प्रवास इतका अविस्मरणीय ठरला की, मारन यांनी त्याचा विशेष उल्लेख अधिकृत पत्रात केला.
- मारन यांनी या पत्राचे नाव ‘अ फ्लाइट टू रिमेम्बर’ असे ठेवले आहे.
- तसं का तर, जेव्हा मारन विमानात पोहोचले आणि बोर्डिंग प्रक्रिया जाहीर झाली, तेव्हा मास्क घातलेला विमानाचा कॅप्टन त्याच्याकडे आला.
- ते कोणी दुसरे नाही तर, राजीव प्रताप रुडी स्वत: होते.
- यानंतरची कहाणी मारन यांनी एका पत्रात शेअर केली आहे.
- हे पत्र १३ जुलै रोजी लिहिले होते.
राजीव प्रताप रुडी व्यावसायिक पायलट!
• राजीव प्रताप रुडी हे व्यावसायिक पायलट लायसन होल्डर
• रुडी हे व्यावसायिक विमानाचे पायलट लायसेन्स होल्डर आहेत.
• ते बर्याचदा विमान उडवतात.
• ते त्यासंबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात.
काही दिवसांपूर्वी बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी व्हिडीओ शेअर करत जाहीर केले की, त्यांनी कोलकाता विमानतळावर इंडिगोच्या दरभंगासाठीच्या विमानसेवेचा शुभारंभ केला तेव्हा त्यांच्या विमानाचे सारथ्य कॅप्टन राजीव प्रताप रुडी यांनीच केले. देशाला खरोखरच असेच नेते पाहिजे आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत, त्यात कमीपणा न मानता अभिमानाने ते मिरवणारे! वेल डन कॅप्टन रुडी!