मुक्तपीठ टीम
रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील चेंबूर, भांडुप आणि विक्रोळी या तीन ठिकाणी घरांवर शेजारच्या संरक्षक भिंत अथवा दरड कोसळली आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना स्थानिक तसेच एनडीआरएफच्या पथकांकडून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. चेंबूरच्या घटनेत किमान अकरा तर इतर दोन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाले आहेत. आणखी काहीजण ढिगाऱ्यांखाली अडकल्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी बचाव मोहिमा सुरु आहेत.
चेंबूर
- ईशान्य मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर झोपडपट्टीलगतची बी. ए. आर. सी.ची संरक्षक भिंत कोसळली आहे.
- या भिंतीलगत असणाऱ्या काही घरांवर ही भिंत कोसळली.
- एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे.
- आज सकाळी साडे सहा-सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे.
- यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
- सकाळपासून मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.
- सध्या एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे.
विक्रोळी
- विक्रोळीतील पंचशील नगरमध्ये दरड कोसळली कोसळली. यामध्ये तिघा रहिवाशांचा दरडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत. आणखी सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- विक्रोळीच्या सूर्यनगर पंचशील परिसरात ही घटना घडली.
- शनिवारी मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.
- त्यांच्यापैकी तीनजणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.
- तर दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भांडुप
- भांडुपमध्ये अमरकोट शाळेजवळ वनविभागाची संरक्षक भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत १६ वर्षीय मुलाने प्राण गमावल्याची बातमी आहे.
कांदिवली
- कांदिवली पूर्व येथे दरड कोसळली आहे.
- त्यामुळे बेस्टचा बस मार्ग क्रमांक २८९ च्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
- आता ही बससेवा दामू नगर बस स्टेशनपर्यंतच जात आहे.