मुक्तपीठ टीम
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी मोठा अलर्ट जारी केला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे की, बँकेची डिजिटल बँकिंग सेवा १६ आणि १७ जुलै रोजी १५० मिनिटांसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत. यावेळी आपणास या सेवा वापरता येणार नाहीत.
बँकेने म्हटले आहे की, मेन्टेनन्सचे काम १६ जुलै रोजी रात्री १०.४५ ते १७ जुलै दुपारी १.१५ पर्यंत अनेक सेवा बंद राहतील. एसबीआयच्या म्हणण्यानुसार या कालावधीत इंटरनेट बँकिंग/ योनो / योनो लाइट / यूपीआय सेवा उपलब्ध नाहीत. यावेळी आपणास या सेवा वापरता येणार नाहीत.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience.#InternetBanking #YONOSBI #YONO #ImportantNotice pic.twitter.com/HwIug1nEFB
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 15, 2021
आठवड्यात दुसऱ्यांदा: गेल्या काही महिन्यांपासून मेन्टेनन्सच्या नावाखाली काही काळ एसबीआयकडून सेवा रखडवल्या आहेत. यापूर्वी १० जुलै आणि ११ जुलै रोजी सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
३१ डिसेंबर २०२० पर्यंत एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या ८ कोटीहून अधिक आहे. त्याच वेळी मोबाइल बँकिंग वापरकर्त्यांची संख्या १.९ कोटी होती तर यूपीआयच्या एकूण वापरकर्त्यांची संख्या १३.५ कोटी होती. एसबीआय योनोचे एकूण ३.५ कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.