Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मांजरपाडा धरणाचे काम पूर्ण; यंदा पूर्ण क्षमतेने पाणी डोंगरगावपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट!

पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

July 15, 2021
in घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal

मुक्तपीठ टीम

मांजरपाडा (देवसाने) धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण झाले असून येवला तालुक्यातील अनकुटे परिसरातील रेल्वे क्रॉसिंगचे व इतर सर्व प्रकल्पाची कामे महिनाभरात पूर्ण होऊन यंदा डोंगरगाव पर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पुणेगाव- दरसवाडी- डोंगरगाव कालव्यावरील येवला तालुक्यातील अनकुटे शिवारात असलेल्या रेल्वे क्रॉसिंगच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, अरुण थोरात, मोहन शेलार, दीपक लोणारी, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, ज्ञानेश्वर शेवाळे, साहेबराव आहेर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मांजरपाडा देवसाने प्रकल्पाचे असलेले आव्हानात्मक असे काम लवकरच पूर्ण होत आहे. यामध्ये एक एक काम अतिशय कठीण काम होते. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकल्पातील रेल्वे क्रॉसिंगचे काम गेल्या दोन वर्षांपासून हे काम प्रलंबित होते. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून यासाठी परवानगी मिळविण्यात आली. आज या क्रॉसिंगचे काम सुरू असून क्रॉसिंगसह राहिलेली किरकोळ कामे या महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी या प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगाव पर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट असून तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ते म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असल्याने यंदाच्या वर्षी पूर्ण क्षमतेने पाणी येणार येवल्याच्या दिशेने येणार आहे. प्रकल्प नवीन असल्याने पहिल्या वर्षी अडचणी येतील मात्र त्या सोडविल्या जातील असे त्यांनी यावेळी उपस्थितांना आश्वस्त केले. तसेच लवकरच येवल्याच्या दिशेने पाणी आल्यानंतर पुन्हा एकदा या कामाची आपण लवकरच पाहणी करून जलपूजन करू असे त्यांनी यावेळी सांगितले.


Tags: Mahavikaras Aghadi governmentMinister Chhagan Bhujbalnashikडोंगरगावधगन भुजबळनाशिकमांजरपाडा
Previous Post

आघाडीकडे बहुमत आहे, मग का घाबरता?

Next Post

“…तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय”

Next Post
pm modi-jayant patil

"...तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!