मुक्तपीठ टीम
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी माहिती दिली आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजता हा निकाल पाहता येईल. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशिरा लागला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावीच्या परीक्षा या रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या सहाय्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी दहावीचा निकाल दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.
असा तपासा निकाल-
- www.sscresult.mkcl.org
- www.maharashtraeduction.com
- निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
- त्यानंतर SSC BOARD RESULT ऑप्शनवर क्लिक करा.
- यानंतर तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
- त्यानंतरच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.
- यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे.
- तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
विद्यार्थ्यांना इयत्ता नववी अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी ५० गुण आणि दहावीत वर्षभरात अंतर्गत मूल्यमापनाचे ५० टक्के गुण एकत्र करून याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.