मुक्तपीठ टीम
देशातील भाजपा सरकारविरोधात काँग्रेस रोज वेगवेगळे मुद्दे घेऊन आक्रमक होत असते. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये तर महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस मोदी सरकारवर रस्त्यावरही उतरत आहे. पण त्याचवेळी राष्ट्रीय पातळीवर मात्र काँग्रेसचे बराच काळ अध्यक्षपद रिकामे आहे. राहुल गांधी तयार नसल्यानं रिकाम्या अध्यक्षपदासह काँग्रेस देशात कार्यरत असताना परदेशात मात्र काँग्रेसने देशांनुसार अध्यक्ष नेमले आहेत. ते शक्य झालं आहे, टेक्नोक्रॅट नेते सॅम पित्रोदा यांच्यामुळे!
परदेशी नेमणुकांमागे टेक्नोक्रॅट नेत्यांचं टेक्निक!
- टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदाकडे ओव्हरसीज कॉंग्रेसची जबाबदारी आहे. त्यांनी या आठवड्यात नवीन नेमणुका जाहीर केल्या.
- युरोपातील २३ देशांमध्ये कॉंग्रेसच्या शाखा आहेत.
- त्यातील ब्रिटनमधील संघटना सर्वात मजबूत आहे.
- पित्रोदा यांनी केलेल्या बहुतेक नेमणुका व्यावसायिक किंवा बौद्धिक क्षेत्रातील आहेत.
परदेशात काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण कोण?
- नॉर्वेमध्ये ‘इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस’ (आयओसी) चे अध्यक्ष म्हणून गीरिसोबरसिंग गिल यांना पक्षाने नियुक्त केले आहे.
- चक्र बीयरच्या वेबसाइटनुसार २००६ साली लाँच झालेली त्यांची बिअर आंतरराष्ट्रीय बाजारातील “पहिली पंजाबी ब्रँड” आहे.
- गिल यांनी सांगितले की त्याचे वडील युरोपमधील आयओसीचे संस्थापक होते आणि आयुष्यभर ते कॉंग्रेसमध्ये राहिले.
- कॉंग्रेसने फिनलँडसाठी ३५ वर्षीय वैज्ञानिक कोमल कुमार यांची निवड केली आहे.
- त्या ब्लड कॅन्सरच्या क्षेत्रात काम करतात.
- त्याशिवाय कॉंग्रेसने इटलीमध्ये दिलबाग चन्ना, स्वित्झर्लंडमधील जॉय कोचट्टू, स्वॉनमध्ये सोनिया हेलडस्टॅड, ऑस्ट्रियामधील सुनील कोरा, बेल्जियममधील सुखिवन प्रीत सिंग, हॉलंडमधील हरपिंदरसिंग घाग आणि पोलंडमध्ये अमरजितसिंग यांची नेमणूक केली आहे.
देशातील कॉंग्रेसचे अध्यक्षपद मात्र रिकामेच!
- कॉंग्रेसला परदेशात अध्यक्षपदासाठी माणसं सापडले असतील, परंतु अद्याप देशात काँग्रेसला अध्यक्ष नाही.
- राहुल यांनी वारंवार नकार दिला आहे, तर पक्षाच्या बहुतेक नेत्यांना गांधी कुटुंबाचेच नेतृत्व पाहिजे आहे.
- अध्यक्षपदाची निवडणूक वेळोवेळी तहकूब करण्यात आली आहे.
- कोरोनाचे कारण देत निवडणुका वर्षातून तीनदा तहकूब करण्यात आल्या.
- सध्या सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.