मुक्तपीठ टीम
केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच यूपीएससीने प्राचार्यांच्या ३६३ पदांसाठी नवीन अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया शनिवार, १० जुलैपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रियेची शेवटची तारीख २९ जुलै आहे.
यापूर्वी यूपीएससीने २४ एप्रिल ते १ मेच्या दरम्यान दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागातील प्राचार्य पदाच्या ३६३ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले होते. कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता आयोगाने ती भरती प्रक्रिया तहकूब केली होती.
पदांची संख्या – ३६३
• महिला- १५५
• पुरुष – २०८
पात्रता
• अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षक पदवी (बीएड) असणे आवश्यक आहे.
• या व्यतिरिक्त उमेदवारांना अध्यापनात दहा वर्षांचा अनुभव असावा.
वय श्रेणी
• या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
• अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.
महत्त्वाच्या तारखा
• अर्ज प्रारंभ तारीख – १० जुलै
• अर्ज करण्याची अंतिम तारीख – २९ जुलै
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची परीक्षा व मुलाखतींमधील मूल्यांकनाच्या आधारे निवड केली जाईल.
असा करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार www.upsc.gov.in मार्फत ऑनलाईन अर्ज करण्याच्या २९ जुलै या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.