मुक्तपीठ टीम
सोन्यात बचत करणं हा आपल्याकडचा पारंपरिक असा सर्वाच सुरक्षित मार्ग मानला जातो. पण काळानुसार सोन्याच्या दागिन्यांमध्ये किंवा नाण्यांमध्ये, तुकड्यांमध्ये बचत करणे हे तेवढेसे सुरक्षित राहिलेले नाही. त्यात पुन्हा वेगवेगल्या प्रकारे फसगत होण्याचीही भीती असते. पण सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीचा फायदा हा सरकारी कमाल सुरक्षिततेबरोबर देण्याचा पर्याय सरकारने उपलब्ध केला आहे. तो सुवर्ण रोखे योजनेच्या माध्यमातूनच! म्हणजे मूल्य सोन्याचं पण सुरक्षितता सरकारची! सुवर्ण रोख्यांची इश्यू किंमत ४ हजार ८०७ रुपये प्रति ग्रॅम असेल. तर ऑनलाईन खरेदीदारांना ग्राममागे ५० रुपये सूट
असेल.
कसे आहेत सुवर्ण रोखे?
• भारत सरकारने सुवर्ण रोख्यांसाठी नवीन अधिसूचना नुकतीच जारी केली आहे.
• भारत सरकारची अधिसूचना क्र .४(५)-B(W&M)/२०२१ दिनांक १२ मे २०२१ आहे.
• सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २०२१-२२ – मालिका -IV निपटारा तारीख २०,जुलै, २०२१ ही आहे.
• १२-१६ जुलै या कालावधीत उघडल्या जातील.
• आरबीआयच्या ९ जुलै २०२१च्या प्रसिद्धीपत्रकात प्रसिद्ध केल्यानुसार या खरेदी कालावधीत रोख्यांची इश्यू किंमत ४ हजार ८०७ रुपये (फक्त चार हजार आठशे सात रुपये) प्रति ग्रॅम असेल.
ऑनलाईन खरेदीदारांना ग्राममागे ५० रुपये सूट
• रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार भारत सरकारने ऑनलाईन अर्ज आणि देय रक्कम डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू किंमतीत प्रति ग्राम ५० रुपये सूट देण्याचे ठरवले आहे.
• अशा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांचे मूल्य ४,७५७ रुपये प्रति ग्रॅम असेल.