मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून म्हणजेच जवळजवळ दीड वर्षांपासून रिअल हिरो सोनू सूद माणुसकीचा वसा निभावतो आहे. आपल्यापरीने जी मदत करता येईल ती मदत तो करत आहे. नवं उदाहरण एका चिमुरडीचं. सोनू सूद यांच्या मदतीने सादुलशहर येथील आठ महिन्यांची मुलगी कोमलवर मुंबईत उपचार सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सोनू सूद यांना या मुलीच्या उपचारासाठी साकडं घालण्यात आलं. त्यांनी व्यवस्था केली तिचे पालक मुंबईला आले आहेत.
चिमुरडीवर मोठी शस्त्रक्रिया
• डॉ. प्रिया प्रधान यांना या मुलीवरील उपचारांची माहिती आहे.
• त्यांनी या मुलीवरील उपचारांची माहिती दिली.
• या मुलीचे ४ मोठे शस्त्रक्रिया केल्या जातील.
• या शस्त्रक्रियांमध्ये त्या मुलीच्या जीवाला धोका आहे.
• कोमल ही ८ महिन्यांची आहे, म्हणून या शस्त्रक्रिया जास्त मोठ्या, नाजूक आहेत.
मुलीच्या वडिलांची तयारी
• जर मुलीवर उपचार केले गेले नाही तर, तिचा असाही मृत्यूच होईल. डॉक्टर हे ईश्वराचे रूप आहे.
• माझ्या मुलीच्या हृदयाची शस्त्रक्रिया चांगल्या डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली केले जाणार आहे.
कोमलवर उपचार सुरू करण्यास डॉक्टरांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरच ती ठीक होईल. सामाजिक कार्यकर्ते कौशल सिंगल, कॉन्सिलर मनीष शर्मा आणि आझाद क्लब यांच्या प्रयत्नातून या मुलीवर झालेल्या उपचाराची माहिती सोनू सूदपर्यंत पोहोचली. सादुलशहर येथून जात असताना तिच्या पालकांना मुलीच्या उपचारासाठी सोशल मीडियावरुन ६१ हजार रुपयांची मदतही मिळाली आहे.