मुक्तपीठ टीम
अनेकांच्या घरातील सर्वात दुर्लक्षित भाग तो असतो ज्याचे आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्व असतं. तो भाग म्हणजे आपल्या घरातील शौचालय. जागतिक पातळीवर झालेल्या संशोधनातून शौचालय आणि आरोग्य याचा संबंध उघड झालेला आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, आपल्या शरीरातील जवळजवळ २५ ते ५४ टक्के मल हा आतड्यातील सूक्ष्मजीवांनी बनवलेला असतो. अनेक अनुवांशिक चाचण्यांमध्ये मलच्या नमुण्यांमध्ये विषाणूही आढळले आहेत. हे विषाणू किती संसर्गित करु शकतात, हे सिद्ध झालेले नसले तरीही त्यांचं अस्तित्व धोकादायकच मानलं जातं.
तज्ज्ञ काय सांगतात?
• मानवी मल आणि मूत्रात अनेक जिवाणू आणि विषाणू असू शकतात.
• त्यात स्टेफीलोकोकस, कॅम्पीलोबॅक्टर, एन्टीरोकोकस, एस्केरेशिया कोली, साल्मोनेला, शिगेला, स्ट्रीप्टोकोकस, रोटावायरस, शिगेला, स्ट्रेप्टोकोकस यांसारख्या जिवाणूंचा समावेश आहे.
• तसेच पेपिलोमा विषाणू, रोटा विषाणू, हेपिटायटीस ‘ए’ आणि ‘ई’ यांसारख्या विषाणूंचाही समावेश असू शकतो.
शौचालयातून पसरू शकतो धोका
• शौचालयात जंतूंचा प्रसार हा अस्वच्छतेमुळे होतो.
• त्यामुळे नंतर ते घराच्या इतर भागामध्ये सहजपणे पसरतात.
• जसे की नळांचे हँडल, जे लक्षात येत नसले तरी सर्वात अस्वच्छ असू शकते.
• शौचालयात फ्लश केल्याने तयार झालेले एरोसोलचे थेंब हे जिवाणू आणि विषाणू दोघांचेही प्रसार माध्यम बनू शकते.
• एखाद्या व्यक्तीस शौचालयात तयार झालेल्या एरोसोलने संसर्ग होऊ शकतो.
शौचालयांची स्वच्छता कशी करावी?
• शौचालये आणि आंघोळीच्या ठिकाणी जंतूंचा प्रसार होऊ नये यासाठी कमाल खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
• जीवाणू-विषाणू नष्ट करण्यासाठी शौचालय, बाथटब, सिंक आणि सर्व हँडल्स वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
• दुर्गंधातून शौचालयाची स्वच्छतेची पातळी कळू शकते.
• शौचालयातील टॉयलेट सीट, या जंतूंचे आगार असू शकतात.
• बरेच लोक आपली शौचालये व्यवस्थित स्वच्छ करीत नाहीत.
• आपण आपले टॉयलेट बर्याचदा स्वच्छ करत असाल, परंतु जंतू आणि विषाणू काढून टाकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शौचालयाला संसर्गमुक्त करणे.
• आपण निवडलेल्या टॉयलेट क्लीनरमध्ये दुर्गंध दूर करण्याची क्षमता आहे की, नाही हे आधी सुनिश्चित करा, मगच त्यांची निवड करा.