Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पक्ष्यांना घराच्या बाल्कनीत खाद्य घालण्यावर बंदी! न्यायालयानं बजावलं!

July 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
feeding birds

मुक्तपीठ टीम

पशु-पक्ष्यांच्या अन्न आणि पाण्याची व्यवस्था अनेक जण करतात. काही जण घराच्या बाल्कनीत तर काही जण घराच्या गच्चीमध्ये यासाठी खास व्यवस्था करतात. मात्र पक्ष्यांच्या खाण्यापिण्याची सोय करताना घरातल्या कुणा व्यक्तीला किंवा आजूबाजूच्या लोकांना त्रास होत असेल तर यावर उपाययोजनाही केल्या गेल्या पाहिजेत. तब्बल १० वर्षांनंतर दिवाणी न्यायालयाने एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत पक्ष्यांना खाद्य घालण्यास बंदी घातली आहे. २०११ मध्ये एका दांपत्याने याप्रकरणी याचिका दाखल केली होती.

 

दिलीप शहा (७१ वर्ष) यांचा वरळीच्या व्हिनस हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट आहे. त्यांच्या फ्लॅटच्या अगदी वरच्या फ्लॅटमध्ये राहणारे जिगीशा आणि पद्मा ठाकोरे राहतात. जिगीशा वन्यजीव कार्यकर्ता आहेत. पक्ष्यांना खाद्य घालण्यासाठी त्यांनी बाल्कनीत मेटल-ट्रे म्हणजेच एक मोठा प्लॅटफॉर्म तयार केला. त्यानंतर मोठ्या संख्येने पक्षी, कबूतर येऊ लागले असा आरोप दिलीप शहा आणि त्यांच्या पत्नीने केला आहे.

 

वृद्ध दांपत्याने जिगीशाला या समस्यांबद्दल सांगितले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. यासंदर्भात वृद्ध दांपत्याने हाऊसिंग सोसायटीकडे तक्रार केली पण तिथेही तोडगा निघाला नाही. यानंतर वृद्ध जोडप्याने आपल्या वकिलामार्फत २०११ मध्ये जिगीशा ठाकोरे आणि पद्मा ठाकोरे यांच्याविरोधात मुंबईच्या दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. शहा यांनी सांगितले की, त्यांच्या फ्लॅटमध्ये पक्ष्यांची शीट आणि पक्ष्यांना दिले जाणारे धान्य खाली पडते. धान्यांमध्ये लहान कीटक असतात, जे त्यांच्या बाल्कनीत पडतात. यामुळे त्यांच्या बाल्कनीत दुर्गंधी पसरते. घराच्या बाल्कनी आणि खिडक्या साफ करण्यात अडचणी निर्माण होतात.

 

काय आहे वृद्ध दांपत्याचं म्हणणं?

  • वृद्ध महिलेला आधीच त्वचेची समस्या आहे.
  • फ्लॅटच्या बाल्कनीत धान्य पडल्यामुळे आणि इतर कारणांमुळे त्यांची समस्या वाढत गेली.
  • वन्यजीव कार्यकर्ते ठाकोरे कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं.
  • पक्ष्यांना अन्न आणि पाणी घालणे पुण्याचे काम आहे, असं ठाकोरे कुटुंबियांचं म्हणणं आहे.
  • त्यांच्या कामात अडथळे आणण्याऐवजी, खाली पडलेल्या धान्याच्या समस्या सहन करा.
  • या प्रकरणातील सुनावणीदरम्यान पद्मा ठाकोरे यांचा मृत्यू झाला आहे.

 

काय आहे कोर्टाचं म्हणणं?

  • संपूर्ण प्रकरणात सर्व बाजू ऐकल्यानंतर दिवाणी कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एच. लडाड यांनी निर्णय दिला.
  • मेटल ट्रेमध्ये धान्य ठेवून पक्ष्यांना खायला देणारे ठाकोरे कुटुंबियांचे वर्तन वृद्ध दांपत्याला त्रासदायक आहे.
  • शाह यांची बाल्कनी अगदी खालीच आहे.
  • त्यामुळे बाल्कनीत ठाकोरे कुटुंबाला पक्ष्यांना खाद्य घालण्यास कायमस्वरुपी बंदी घालत आहोत.

Tags: mumbaiदिवाणी न्यायालयमुंबईहाऊसिंग सोसायटी
Previous Post

“विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत!”: नाना पटोले

Next Post

किरकोळ आणि घाऊक व्यवसायालाही एमएसएमईचा लाभ

Next Post
MSME

किरकोळ आणि घाऊक व्यवसायालाही एमएसएमईचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!