मुक्तपीठ टीम
मोबाईलवर गुगल असिस्टंट सुरू केल्यावर तुम्ही ‘ओके गूगल’ म्हणताच कंपनीचे कर्मचारी ते ऐकतात. अशी धक्कादायक कबुली गुगलच्या अधिकाऱ्यांनी स्वतः शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीमध्ये दिली. इतकेच नाही तर गुगल टीमनेही कबूल केले की कधीकधी यूजर्स व्हर्च्युअल असिस्टंट वापरत नसतानाही त्यांचे संभाषण रेकॉर्ड केले जाते. जोपर्यंत यूजर्स स्वतः ते हटवत नाही तोपर्यंत कंपनी संचयित डेटा हटवित नाही. गुगल असा युक्तिवाद करतो की त्याचे कर्मचारी स्पीच रिकॉग्निशन सुधारण्यासाठी संभाषणे ऐकतात.
गुगलने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांनी यूजर्सनी केलेले सर्वसामान्य संभाषणच ऐकले आहेत, संवेदनशील खासगी संभाषण कर्मचाऱ्यांनी ऐकलेले नाही. मात्र त्यावर संभाषणाची संवेदनशील व सर्वसामान्य स्तरावरचे अशी वर्गवारी कोणत्या निकषांवर केली जाते असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले नाही. झारखंडमधील भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. गुगलच्या यूजर्सचे संभाषण त्यांच्या नकळत ऐकणे हे खासगीपणाच्या हक्काचे उल्लंघन आहे, असे समितीने म्हटले.
समितीच्या वतीने लवकरच याबाबत अहवाल तयार केल्यानंतर सरकारला आणखी काही सूचना देण्यात येतील. समितीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींना यूचना देण्यात आल्या की, सांगितले की त्यांनी विद्यमान डेटा संरक्षणामध्ये त्रुटी शोधणे आवश्यक आहे.
७० कोटी लिंक्डइन यूजर्सचा डेटा चोरी-
- लिंक्डइनच्या ७० कोटीहून अधिक यूजर्सचा डेटा लीक झाल्याची नोंद आहे.
- लीकमध्ये लिंक्डइन यूजर्सपैकी सुमारे ९२% यूजर्सचा डेटा समाविष्ट आहे.
- यात फोन नंबर, पत्ता, स्थान आणि यूजर्सचा पगार यासारख्या वैयक्तिक माहितीचा तपशील समाविष्ट आहे.
- डार्क वेबसाइटवर डेटा विकला जात आहे.
- माहितीनुसार, हॅकर्सने डार्क वेबच्या सार्वजनिक डोमेनमध्ये दहा लाख यूजर्सचा डेटा पोस्ट केला आहे.
- मात्र लिंकडइनने डेटा लीक न झाल्याचे सांगितले आहे. ते म्हणतात की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.