मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल असेही अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातचं सीरमने लहान मुलांच्या लसीकरणासंबंधित एक चांगली बातमी दिली आहे. सीरम लवकरचं कोवोवॅक्स लशीची चाचणी ९२० लहान मुलांवर करणार आहे. त्यासाठी कंपनी लवकरचं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी नोव्हावॅक्सने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी कोरोना लस बनविण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. कोवोवॅक्स नावाने नोव्हावॅक्सची कोरोना लस भारतात तयार केली जात आहे. सप्टेंबरपर्यंत सीरम ही लस भारतात आणण्याची योजना आखत आहे. भारतात त्याची ब्रिजिंग चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मुलांवर याची एक स्वतंत्र वैद्यकिय चाचणी असेल आणि त्यामध्ये सर्व काही व्यवस्थित झाल्यावरच ती मुलांसाठी उपलब्ध होईल.
पुढील महिन्यात १० ठिकाणी चाचणी घेण्यात येईल-
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी सांगितले की ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ची परवानगी घेतल्यानंतर आम्ही पुढच्या महिन्यात १० ठिकाणी ९२० मुलांमध्ये पीडियाट्रिक ट्रायल सुरू करण्याचा विचार करीत आहोत.
सहा महिने पाळत ठेवली जाणार
- पूनावाला म्हणाले की पीडियाट्रिक ट्रायल घेण्यात येणाऱ्या १० जागेत भारती हॉस्पिटलची वडू शाखा आणि पुण्यातील केईएम हॉस्पिटलचा समावेश आहे.
- कोवोवॅक्सच्या दोन डोसच्या लसीकरणानंतर, सहा महिन्यांपर्यंत त्यांच्यावर पाळत ठेवली जाईल.
चाचणी अशाप्रकारे सुरू होईल
- पूनावाला म्हणाले की, चाचणीच्या डिझाइननुसार, सुरुवातीला १२ – १७ वयोगटातील मुलांवर लशींची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणी घेण्यात येईल.
- ते म्हणाले की आम्ही वयाच्या उलट क्रमाने चाचण्या सुरू करू.
- पूनावाला म्हणाले की एसआयआय परवान्यासाठी तीन महिन्यांच्या प्रगत क्लिनिकल चाचणीनंतर सुरक्षा आणि प्रतिकारशक्तीवर अंतरिम चाचणी तपशील सादर करेल.
- ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनी जागतिक चाचणी निकालाच्या आधारे चाचणी पूर्ण होण्यापूर्वी लस परवान्यासाठी अर्ज करू शकते.