Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ओबीसी आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही!”

राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनातून भाजपाचा राज्य सरकारला इशारा

June 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
BJP

मुक्तपीठ टीम

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे शनिवारी झालेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, ओबिसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यात एक हजारांहून अधिक ठिकाणी हे आंदोलन झाले.

 

नागपूर येथील आंदोलनात सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे राजकीय षड्यंत्र आहे. आघाडी सरकारने वेळेत कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली असती तर हे आरक्षण रद्द झाले नसते. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची या सरकारची इच्छाच नाही असे वाटते आहे.

 

कोल्हापूर येथे आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने राज्यभरात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हे आरक्षण गमाविण्याची वेळ आली आहे.

 

राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पुणे येथे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पंकजा मुंडे यांनी सांगितले की सत्ताधारी पक्षातील काही मंडळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने विरोधी पक्षांच्या सहकार्याने तातडीने हालचाली करायला हव्यात.

 

खा. डॉ. प्रीतम मुंडे या परळी येथे, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष खा. डॉ. भारती पवार या नाशिक येथे, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे हे संभाजीनगर येथे, आ.गोपीचंद पडळकर हे सांगली येथे आंदोलनात सहभागी झाले होते.


Tags: BJPchandrashekhar bawankuledevendra fadanvispravin darekarओबीसी आरक्षणदेवेंद्र फडणवीसपंकजा मुंडेप्रीतम मुंडेमराठा आरक्षण
Previous Post

आता कोरोना उपचार खर्च आणि नुकसान भरपाई करमुक्त!

Next Post

निवडणुकीत गमावलेला ओबीसी मतदार आक्रमक आंदोलनानं भाजपाकडे परतणार?

Next Post
BJP

निवडणुकीत गमावलेला ओबीसी मतदार आक्रमक आंदोलनानं भाजपाकडे परतणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!