मुक्तपीठ टीम
कोरोनाविरूद्धच्या लढाईला आणखी बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या उपचारासाठी केलेल्या खर्चावर यापुढे कर नसणार. तसेच मृत्यूनंतर मिळालेल्या भरपाईवर कोणताही कर आकारला जाणार नाही. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनाबाधितांना दिलासा
• कोरोनाच्या उपचारासाठी कंपनीकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून घेतलेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही.
• ही सूट वर्ष २०१९-२० आणि २०२१-२२ साठी आहे. एवढेच नव्हे तर, सरकारने कर संबंधित कागदपत्रांच्या पूर्ततेची तारीखही वाढविली आहे.
अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, “कोरोना साथीच्या आजारामुळे बर्याच जणांनी नोकर्या गमावल्या. या काळात त्यांना आजारपणाचा खर्चदेखील झाला. अनेक समस्या निर्माण झाल्या. म्हणूनच, सरकार त्यांना करात कोरोनाबाधितांच्या देऊ इच्छित आहे.”
कशी आणि किती मिळणार करमुक्ती?
• कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या पीडित कुटुंबाला जर एखाद्या कंपनीने पैसे दिले असतील तर, या रक्कमेवर आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२२ मध्ये सूट देण्यात येईल.
• ही सवलत केवळ एखाद्या व्यक्तीने त्याच्या मित्राला, नातेवाईकांना किंवा इतर कोणाला मदत करण्यासाठी दिलेल्या एक्स-ग्रॅटिया पेमेंटवर उपलब्ध असेल. रक्कम मर्यादा १० लाख रुपये असेल.
ठाकूर म्हणाले की, “घर खरेदी केल्यावरही कर सूट कालावधी वाढविण्यात येत आहे. यात कर कपात ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच, आता घर खरेदीदार ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता खरेदी करू शकतात. त्यांना सूट मिळेल.”