मुक्तपीठ टीम
कोरोनाने जगभरात हाहाकार माजवलेला असताना त्याचे नवीन व्हेरिएंट चिंतेचा विषय बनत आहेत. अशात एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. संशोधक अशी सुपर वॅक्सिन तयार करत आहेत, जी भविष्यात कोरोनामुळे उद्भवणाऱ्या प्रत्येक महामारीपासून वाचवू शकेल. या लसीची उंदरांवर यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.
नव्या व्हेरिएंटशी लढण्यास लस सक्षम
• ही सुपर वॅक्सिन अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाने तयार केली आहे.
• या संशोधनाला सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
• तज्ज्ञ संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ही लस कोरोनाच नाही तर कोरोनाच्या नव्या आणि धोकादायक व्हेरिएंट विरुद्ध लढण्यास मदत करेल.
• याची चाचणी उंदरांवर केली असून, पुढील वर्षापर्यंत माणसांवर त्याची चाचणी केली जाण्याची शक्यता तज्ज्ञ संशोधकांनी वर्तवली आहे.
• तसेच कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट भविष्यात नव्या महामारीला जन्म देऊ शकतात, त्यामुळे या संकटाला रोखण्यासाठी या सुपर वॅक्सिनला तयार केले जात असल्याचं, तज्ज्ञ संशोधकांनी म्हटले आहे.
दरम्यान, उंदरांवर केलेल्या चाचणीमध्ये या लसीने अशा अॅन्टीबॉडीज तयार केल्या, ज्या स्पाइक प्रोटीन विरुद्ध ही प्रभावी आहेत. तसेच ही लस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या बी.१.३५१ या व्हेरिएंटवरही अतिशय प्रभावी ठरली होती.