मुक्तपीठ टीम
सोशल मीडियाच्या नवीन नियमांवरून केंद्र सरकारशी संघर्ष सुरू असतानाच आज ट्विटरकडून आगीत तेल नाही तर पेट्रोल ओतणारी घटना घडली. ट्विटरने आज तासाभरासाठी आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे खाते ब्लॉक केले होते. आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्वत: ही माहिती उघड केली आहे. मात्र, त्यांच्या ट्विट केलेल्या स्क्रिनशॉटनुसार कॉपीराइट कंटेंट उल्लंघनाच्या तक्रारीमुळे अमेरिकन कायद्यानुसार अकाउंट ब्लॉक केले गेले होते. तसेच अकाऊंट पुन्हा सुरु करताना पुन्हा असे झाले तर कायमचं बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ट्विटरने नोटिसमध्ये अमेरिकन कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाचं कारण देत पुन्हा असं झालं तर अकाउंट कायमचं ब्लॉक करण्याचा इशाराही दिला आहे.
नेमकं काय घडलं?
- भारताचे केंद्रीय कायदा, आयटी मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी याबद्दल माहिती दिली.
- गेल्या एका तासापासून ते त्यांचे ट्विटर खाते वापरु शकले नाहीत.
- ते म्हणाले की, प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर, त्यांच्या खात्याने अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याची नोटीस आहे.
- एका तासानंतर खाते पुन्हा सुरु झाले.
- त्यांचे खाते ब्लॉक केल्यामुळे ट्विटरने भारतातील आयटी नियम ४ (८) चे उल्लंघन केले आहे.
Friends! Something highly peculiar happened today. Twitter denied access to my account for almost an hour on the alleged ground that there was a violation of the Digital Millennium Copyright Act of the USA and subsequently they allowed me to access the account. pic.twitter.com/WspPmor9Su
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) June 25, 2021
ट्विटरला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पर्वा नाही!
- आयटी आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.
- ट्विटरच्या कृतीतून असे दिसते की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नुकसान करणार नाहीत, असा ते दावा करतात, पण त्यांना त्यांचा अजेंडा चालविण्यातच रस असतो. या धमकीसह, त्यांना हे दर्शवायचे आहे की जर आपण त्यांच्याद्वारे आखलेल्या रेषेचे पालन केले नाही तर ते आपोआप त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकतील. मात्र त्यांना कायदे पाळावेच लागतील आणि कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
कॉपीराइट उल्लंघन हा पाश्चात्या देशांमध्ये आपल्यापेक्षाही गंभीर गुन्हा
रविशंकर, शशि थरुर यांच्याकडून त्याला आता वेगळा रंग दिला जात असला तरी तज्ज्ञांच्या मते कॉपीराईट कायद्यांचा विचार करता जिथे ते कायदे आपल्यापेक्षा जास्त कडक आहेत, तेथे अशी कारवाई ही अटळ असते.
So I won’t blame @Twitter for this action or attribute the motives to them that @rsprasad does, though it wasn’t pleasant finding my account locked. Clearly they had no choice but to honour a DMCA takedown notice, however stupid & pointless the request was.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) June 25, 2021