मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात मोठे विमान पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालत आहे. जगातील सर्वात जबरदस्त आणि प्रदीर्घ काळ काम करणार्या अँटोनोव्ह एएन-२२५ ने जवळपास १० महिन्यांनी पहिले उड्डाण केले आहे. ८४ मीटर लांबी असलेल्या या विमानाने युक्रेनची राजधानी कीवमधील गोस्टोमेल अँटोनोव्ह विमानतळावरून उड्डाण केले.
अँटोनोव्ह एएन-२२५ विमानाने मंगळवारी गोस्टोमेल अँटोनोव्ह विमानतळावरून भरारी घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिणेकडून उड्डाण केल्यानंतर, विमान काळ्या समुद्राच्या दिशेने पूर्वेकडे वळले. कॅस्पियन समुद्र आणि तुर्कमेनिस्तान ओलांडण्यापूर्वी जॉर्जिया आणि अझरबैझानमध्ये हे विमान दिसले. अँटोनोव्ह विमान काबुलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. बुधवारी हे विमान अफगाणच्या राजधानीत उतरले, असे कळते.
जगातील सर्वात मोठे विमान
• २०२० च्या ऑगस्ट महिन्यानंतर जगातील सर्वात मोठे विमान एएन-२२५ चे मंगळवारी रात्री पहिले उड्डाण झाले.
• तेल अवीव ते गोस्टोमेलला ३ ऑगस्टच्या उड्डाणानंतर, ऑपरेटरने हाय-मेन्टेनन्स असल्यामुळे विमान सेवा मुक्त केले होते.
• अँटोनोव्ह एएन-२२५ हे एक प्रकारचे मालवाहू विमान आहे.
• ते विमान ८० च्या दशकात सोव्हिएत युनियनमध्ये बनले होते.