मुक्तपीठ टीम
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि तांत्रिक संस्थांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील मोफत लसीकरणासाठी धन्यवाद मानणारे फलक लावण्यास सांगितले आहे.
या महिन्याच्या सुरूवातीस पंतप्रधानांनी केंद्र सरकारकडून १८ वर्षांवरील नागरिकांच मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. त्याची सुरुवात सोमवारपासून झाली. रविवारी विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना पाठविलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये यूजीसी सचिव रजनीश जैन यांनी संस्थांना तसे फलक सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यास सांगितले. त्या आदेशामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
असा असावा मोदींचे आभार मानणारा फलक…
- फलक कशा पद्धतीचं असावे, याबद्दलचं डिझाईनही विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितले आहे.
- हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेत हे फलक आहेत.
- या फलकावर ‘सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी मोदीजी, धन्यवाद,’ असा आशयाचा मजकूर आहे.
कोणत्या विद्यापीठांनी फलक शेअर केले?
- दिल्ली विद्यापीठ
- हैदराबाद विद्यापीठ
- भोपाळमधील एलएनसीटी युनिव्हर्सिटी, गुरगावमधील बेनेट विद्यापीठ,
- नॉर्थकॅप युनिव्हर्सिटी
यासारख्या संस्थांनी थँक्यूयू मोदीजी हॅशटॅगसह सोशल मीडिया पेजवर फलक शेअर केला आहे.
यूजीसीच्या फलक आदेशामुळे वाद
- युजीसीच्या या फलक आदेशावर वाद निर्माण झाला आहे.
- शैक्षणिक, विद्यार्थी संस्था आणि विद्यार्थी नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
- योगेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर लिहिले की यूजीसीचे माजी सदस्य म्हणून मला लाज वाटते. ते यूजीसीचे माजी सदस्यही आहेत.
- ते म्हणालेत, त्यांच्या २०१०-१२ कार्यकाळातही यूजीसीमध्ये काही गोष्टी सडलेल्या होत्या, परंतु अशा चमचेगिरीची कधी कल्पनाही केली नव्हती.