मुक्तपीठ टीम
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये हॅंडीमन आणि लोडर या पदासाठी ७३ जागा, सुपरवाइजर या पदासाठी २६ जागा, सिनियर सुपरवाइजर या पदासाठी ४ जागा अशा एकूण १०३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) ८वी उत्तीर्ण २) कार्गो हॅन्डलिंग मध्ये १ वर्ष अनुभव
२) पद क्र.२- १) पदवीधर २) कार्गो इंडस्ट्री मध्ये १ वर्ष अनुभव
३) पद क्र.३- १) पदवीधर २) कार्गो इंडस्ट्री मध्ये २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षापर्यंत, पद क्र.२ साठी ३० वर्षापर्यंत, पद क्र. ३ साठी ३५ वर्षापर्यंत वय असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ पीएच/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.becil.com/ वरून माहिती मिळवू शकता.