मुक्तपीठ टीम
मागच्या वर्षी २०१९ मध्ये होंडाने आपली बेनली ई इलेक्ट्रिक स्कूटर सीरीजला पहिल्यांदा सादर केले होते. या सीरीजमध्ये एकूण चार मॉडेल आहेत. सध्या या स्कूटरचे ऑटोमोटिव रिसर्च एसोसिएशन ऑफ इंडियाद्वारे टेस्टिंग सुरु आहे. ह्या सीरिज मध्ये सगळ्या स्कूटरमध्ये वेगवेगळे फीचर्स देताना तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.
टेस्टिंग मॉडेलमध्ये होंडाने एलईडी हेडलँप डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि एक्सेसरीज पॉवर सॉकेट दिले आहे. रिवर्स एसिस्ट फंक्शन सारखे फीचर पण दिले गेले आहेत. स्कूटरच्या समोरच्या भागात मोठा बास्केट आणि मागे कॅरियरसुद्धा दिले आहे. त्यावर ६० किलो वजन घेतले जाऊ शकते. ही स्कूटर सध्या सिंगल कलर रोज व्हाइटमध्ये उपलब्ध आहे.
- बेनली ई इलेक्ट्रिक स्कूटरच्या समोर १२ इंच आणि मागे १० इंच टायर दिले आहे.
- वजन पूर्ण १२५ ते १३० किलो आहे.
- या स्कूटरमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस) आहे.
- ह्या स्कूटरला व्यावसायिक कामासाठी व्यावसायिकसुद्धा वापर केला जाऊ शकतो. ही स्कूटर सिंगल चार्ज मध्ये दर तासाला ३० किलोमीटर वेगाने चालल्यावर ८७ किलोमीटरची रेंज देईल.
- ही स्कूटर दर तासाला ६० किलोमीटर वेगाने चालल्यावर ४३ किलोमीटर रेंज देईल.
- यामध्ये ४८व्ही क्षमतेच्या दोन लिथियम-आईऑन बॅटरी आहेत.
- ज्याला मोबाईल पॉवर पॅक नाव दिले आहे.
- ह्या दोन्ही बॅटरी सहजरित्या गरज पडल्यावर स्कूटर मधून बाहेर निघू शकतात.
- त्यांना घरच्या सॉकेटने चार्ज केले जाऊ शकते.
- भारतातील टेस्टिंग पूर्ण झाले की लवकरच स्कूटरला बाजारात आणले जाईल.