मुक्तपीठ टीम
रेशनकार्डधारकांना आता रेशनकार्डवर नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध कोट्याव्यतिरिक्त ५ किलो मोफत अन्नधान्याचा अधिकार आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या घोषणेमुळे रेशन कार्ड पुन्हा चर्चेत आले. पण सरकारने दिलेले या रेशनकार्डवरून मिळत नसेल तर काय कराल? सोपं आहे. तेच समजवण्याचा प्रयत्न आहे.
रेशन कमी देत असल्यास किंवा देत नसल्यास काय करावे?
• जर एखादा दुकानदार तुम्हाला कमी रेशन देत असेल किंवा तो देण्यास नकार देत असेल तर त्याबद्दल तक्रार करता येते.
• राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल म्हणजेच एनएफएसए वर, प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळा टोल-फ्री क्रमांक ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
• कॉम्युटरवर किंवा फोनवर एनएफएसए वेबसाइट https://nfsa.gov.in उघडून येथून नंबर मिळवू शकता.
• आपण या वेबसाइटवर मेलद्वारे आणि फोन नंबरद्वारे तक्रार नोंदवू शकतो.
• येथे आपल्याला प्रत्येक राज्याचा भिन्न टोल-फ्री क्रमांक दिसेल.
हेल्पलाइन नंबर कसे सोडवणार ग्राहकांचे प्रश्न?
• भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारने हेल्पलाइन नंबर सेवा दिल्या आहेत. अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक ग्राहकास उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
• जेणेकरून गरजूंना अनुदानित रेशन पोचवता येईल.
• जर कोणत्याही रेशनकार्डधारकाला त्याच्या हक्काचे धान्य मिळत नसल्यास तो टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करून समस्या सोडवू शकेल.
रेशनकार्डचे दोन प्रकार आहेत
• बीपीएल
• एपीएल
आपल्याला कार्ड बनवताना ते निवडावे लागेल. रेशन कार्ड मिळविण्यासाठी प्रत्येक राज्याची स्वतःची वेबसाइट आहे. आपल्याला फक्त आपल्या राज्याच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा करावा
• प्रथम आपल्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. २. येथे ऑनलाईन अप्लाय रेशन कार्ड करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
• त्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा.
• आयडी पुरावा म्हणून तुम्हाला आधार किंवा मतदार ओळखपत्र आवश्यक असू शकेल.
• अर्जात विचारले गेलेले तपशील भरल्यानंतर ते सबमिट करा.
• व्हेरिफिकेशननंतर रेशनकार्ड एका महिन्याच्या आत तयार होईल.
• यानंतर सरकारी दुकानातून स्वस्त दरात धान्य घेऊ शकतो.