Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज अडचणीत, आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज – छगन भुजबळ

सर्वांना एकत्रित करण्याची संभाजीराजे यांची भूमिका सामंजस्याची

June 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal (1)

मुक्तपीठ टीम

मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा आणि माझ्या पक्षाचा नेहमीच पाठिंबा राहीला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही सर्व पक्षीय भुमिका असून माझी व माझ्या पक्षाची देखील हीच भुमिका आहे. त्या भूमिकेशी मी पुर्णपणे सहमत असून मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुक आंदोलनात व्यक्त केले.

chhagan bhujbal (3)
नाशिक शहरातील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारील मैदानावर  संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या मुक आंदोलनाला मराठा क्रांती मोर्च्याचे पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या निमंत्रणावरून पालकमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले आणि आपली भुमिका स्पष्ट करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की,आज मराठा आणि ओबीसी दोन्हीही समाज अडचणीत आहे,काही लोक जाणीवपुर्वक मराठा समाज व ओबीसी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमची दैवतं ही एकच आहेत.छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर ही आमची दैवत आहेत त्यामुळे कोणीही आमच्यात द्वेष पसरवण्याचे काम करू नये असे त्यांनी स्पष्ट केले.

chhagan bhujbal (2)
मराठा समाजाच्या आरक्षणासह ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही अतिशय महत्वाची असल्याचे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. ज्या ज्या वेळेस विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित झाले त्या त्या वेळेस आम्ही पाठिंबाच दिला आहे. आज आरक्षणाचा प्रश्न हा दोन समाजातील नसुन हा व्यवस्थेविरुद्ध लढा आहे आणि त्याला माझा नेहमीच पाठिंबा असेल असे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

chhagan bhujbal (4)
आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्रित करण्याची जी भुमिका घेतली आहे ती स्वागतार्ह आहे. सर्वांना एकत्रित करताना संभाजी छत्रपती हे अतिशय सामंजस्याची भुमिका घेत असल्याने त्यांचे कौतुक देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Tags: chhagan bhujbalnashiksambhaji chhatrapatiछगन भुजबळनाशिकमराठा आरक्षण
Previous Post

कोल्हापूरनंतर नाशिकला दुसरे मराठा मुक आंदोलन, १५ आमदारांचा पाठिंबा

Next Post

रेशनकार्डबद्दल सर्व काही…रेशन कमी असेल तर काय कराल?

Next Post
ration card

रेशनकार्डबद्दल सर्व काही...रेशन कमी असेल तर काय कराल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!