मुक्तपीठ टीम
आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. योगामुळे लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण झाला, असे नरेंद्र मोदी म्हणाले. यंदाची योग दिनाची थीम ही योग फॉर वेलनेस आहे. कोरोना संसर्गामुळे योग दिनाचा कार्यक्रम व्हर्च्यअल पद्धतीने आयोजित करण्यात आले.
संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित झालेला नसला तरी योग दिनानिमित्त उत्साह कमी झालेला नाही. कोरोना असतानाही योग दिनाने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
आज जब पूरा विश्व कोरोना महामारी का मुकाबला कर रहा है, तो योग उम्मीद की एक किरण बना हुआ है।
दो वर्ष से दुनिया भर के देशो में और भारत में भले ही बड़ा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित नहीं हुआ हों लेकिन योग दिवस के प्रति उत्साह कम नहीं हुआ है: PM @narendramodi #YogaDay
— PMO India (@PMOIndia) June 21, 2021
योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक देश, समाज निरोगी राहावा असं सांगत मोदींनी एकमेकांची ताकद बनूयात असं आवाहन केलं. योगाने संयमाची शिकवण दिली असल्याचंही यावेळी ते म्हणाले. “कोरोनाच्या गेल्या दीड वर्षात अनेक देशांनी संकटाचा सामना केला आहे. लोक योगाला विसरु शकत होते पण त्याउलट लोकांमध्ये योगाचा उत्साह, प्रेम अजून वाढलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे,” असं मोदी म्हणाले.
दुनिया के अधिकांश देशों के लिए योग दिवस कोई उनका सदियों पुराना सांस्कृतिक पर्व नहीं है।
इस मुश्किल समय में, इतनी परेशानी में लोग इसे भूल सकते थे, इसकी उपेक्षा कर सकते थे।
लेकिन इसके विपरीत, लोगों में योग का उत्साह बढ़ा है, योग से प्रेम बढ़ा है: PM #YogaDay
— PMO India (@PMOIndia) June 21, 2021
“जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढलं आहे.”कोरोनाच्या अदृश्य विषाणू जगभरात पसरला, तेव्हा कोणताही देश संसाधनं, मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं की, अशा कठीण प्रसंगी योगासनं आत्मविश्वास वाढवण्याचं मोठं माध्यम बनले, असं मोदींनी यावेळी सांगितलं.
जब कोरोना के अदृष्य वायरस ने दुनिया में दस्तक दी थी, तब कोई भी देश, साधनों से, सामर्थ्य से और मानसिक अवस्था से, इसके लिए तैयार नहीं था।
हम सभी ने देखा है कि ऐसे कठिन समय में, योग आत्मबल का एक बड़ा माध्यम बना: PM #YogaDay
— PMO India (@PMOIndia) June 21, 2021
योगामुळे फक्त शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्य सदृढ होण्यासही मदत मिळते. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीचा मार्ग दाखवतो, असं मोदी म्हणाले.
योग हमें स्ट्रेस से स्ट्रेंथ और नेगेटिविटी से क्रिएटिविटी का रास्ता दिखाता है।
योग हमें अवसाद से उमंग और प्रमाद से प्रसाद तक ले जाता है: PM @narendramodi #YogaDay
— PMO India (@PMOIndia) June 21, 2021
जेव्हा भारताने योग दिनाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते संपूर्ण जगासाठी उपलब्ध व्हावं अशी एकमेव भावना होती.आज त्या दिशेने अजून एक पाऊल टाकत भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून ‘MYoga’ अॅप आणलं आहे. कॉमन योगा प्रोटोकॉलच्या अंतर्गत वेगवेगळ्या भाषेतील व्हिडीओ येथे उपलब्ध असतील.
जब भारत ने यूनाइटेड नेशंस में अंतर्राष्ट्रीय योग दिवस का प्रस्ताव रखा था, तो उसके पीछे यही भावना थी कि ये योग विज्ञान पूरे विश्व के लिए सुलभ हो।
आज इस दिशा में भारत ने यूनाइटेड नेशंस, WHO के साथ मिलकर एक और महत्वपूर्ण कदम उठाया है: PM @narendramodi #YogaDay
— PMO India (@PMOIndia) June 21, 2021
योग ते सहयोगचा मंत्र भविष्यातील मार्ग दाखवत माणुसकीला सशक्त करेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
Addressing the #YogaDay programme. https://t.co/tHrldDlX5c
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2021